हिंगणघाट आगार मध्ये सुरक्षितता अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे केले होते आयोजन..

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

हिंगणघाट :– स्थानिक हिंगणघाट आगार मधेय सुरक्षितता मोहीम चे दी.11जानेवरी ते 25 जानेवरी ,2024 पर्यन्त आयोजन करण्यात आलेआहे.

        गुरुवार रोजी रा.प. हिंगणघाट आगार कार्यशाळेत सकाडी 11-30 वाजता सुरक्षितता मोहीम सन 2024 अंतर्गत राबविण्या संबंधाने उद्घाटन करण्यात आले.

       उद्घटनयाच्या कार्यक्रमाला पालिकाधिकारी देवानंद पुण्णमवार,वी.भा.कर्म वर्ग अधिकारी रा.प.वर्धा यांनी सुरक्षितता मोहीम बाबत मार्गदर्शन केले.

     प्रमुख पाहुणे म्हणून हेमाकांत मशाखोजी उप पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी सुरक्षितता मोहिमेला अनुसरून मार्गदर्शन करुन अपघात कशा प्रकारे टाळता येईल या बाबत मार्गदर्शन केले.

      आगार व्यवस्थापक अनिल हरि आमनेरकर यांनी सुद्धा सुरक्षितता मोहीम बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी संजय त्रिपाठी वाहतूक शाखा पोलीस विभाग,अमोल तायड़े आगार लेखाकार,श्रीमती ज्योति उरकुड़े उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रस्ताविक शम्मी पठान चालक व सूत्र संचालक ए.एस .सैय्यद वाहतूक नियंत्रण आणि आभार प्रदर्शन हर्षल कुत्तरमारे यांत्रिक यांनी केले.

       सदर कार्यक्रमाला चालक,वाहक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.