बेलगाम झालेले अवैध रेती तस्करी वर पुन्हा भद्रावती पोलिसाची कारवाई…

     उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

            तालुक्यातील चंदनखेडा या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमानांत प्रशासनाचा महसूल बुडावीणारे अवैध रेती तस्कर सक्रिय झाले असुन रेती वाहतुकीची चोरी सुरु होती. यावर पुन्हा भद्रावती पोलिसांनी पेट्रोलिंग करताना चंदनखेडा येथे 2 ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करताना जप्त करण्यात आले आहे. 

            प्राप्त माहिती नुसार, दिनांक 11 जाने ला रात्री 1 दरम्यान चंदनखेडा परिसरात अवैध पुन्हा रेती वाहतूक करीत असल्याची माहिती मीडाली. सदर पोलिसांनी चंदनखेडा परिसरात 2 ट्रैक्टर अवैध रेतीचे जप्त करण्यात आला.

           सदर 1 ट्रैक्टर सुमित मुड़ेवार आणि दूसरा ट्रैक्टर नयन जाभूले रा चंदनखेडा व्यक्तीचा असून यांचे विरुद्ध भद्रावती पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशन ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केली आहे.