शहरातील श्री साई कॉन्व्हेन्टचा रोनक देरकर कॅरम स्पर्धेत पोहचला विभागीय स्तरावर….

 

        उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती

        क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अ॑तर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कॅरम क्रिडा स्पर्धेत श्री साई कॉन्व्हेन्ट चा खेळाडू रोनक देरकर इयत्ता 7 वी यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.

        जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत श्री साई कॉन्व्हेन्ट च्या खेळाडू ने बाजी मारली असुन तो आता विभाग स्तरावर खेळणार आहे. कॅरम स्पर्धेत १४ वर्षा आतील मुलांच्या गटात रोनक देरकर या खेळाडू ने जिल्हा स्तरावर विजेते पद मिळविले.

          यान॑तर तो विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या विजयी खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापीका कु. किरण कोथळे ,शारीरिक शिक्षक सुनील दैदावार आणि आई वडील यांना दिले. या विजयी खेळाडूचे श्री साई कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे , संस्था अध्यक्ष प्रा.अतुल गु॑डावार , रुपा गुऺडावार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले, असुन विभागीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या .