मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेणे ओबीसी समाज खपवुन घेणार नाही- अविनाश पाल… — सावली येथे भाजपा ओबीसी मोर्चा तालुका सावलीच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन…

       सुधाकर दुधे 

तालुका प्रतिनिधी सावली 

          सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजातील काही नेते व संघटना मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा अशी भूमिका घेताना दिसत आहेत.

        तसेच मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्याचा षडयंत्र रचल्या जात आहे. 

          त्यामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली असून विविध ओबीसी संघटनेच्या माध्यमातून या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात होत आहे. 

            मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नका यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा तालुका सावलीच्या वतीने आज या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.

             सरकार ने मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही.पण ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन समाविष्ट करू नका अन्यथा ओबीसी समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

          यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुरचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष श्री अविनाश भाऊ पाल,भाजपा महामंत्री सतीश बोम्मावार,भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष जितेश सोनटक्के,भाजपा जेष्ठ नेते प्रकाश पा.गडमवार,दादाजी पा. किनेकर,भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,गौरव संतोषवार,इम्रान शेख,राकेश गोलेपलीवार,दिपक शेंडे,नितीन पाल,कोंडया बोदलकर,प्रभाकर रोहनकर,तुळशीदास भुरसे,विशाल कंरडे,सौरभ गोहने,देवराव चलाख,निलंकठ संहारे,आदी बहुसंख्याने सावली तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.