सुधाकर दुधे
तालुका प्रतिनिधी सावली
कृष्ण जन्माष्टमी निमीत्य व्याहाडखुर्द येथील अंगणवाडीत कृष्णजन्म सोहळा व रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला अंगणवाडीतील बालगोपाल कृष्ण व राधाच्या वेषभुषेत येऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला तसेच छोट्या बालगोपालांनी एकमेकांच्या हातावर राखी बांधली गरबा नृत्याचा आंनद घेतला.
बालकांना आपल्या संस्कृतीचा व उत्सवा बद्दल लहानपणा पासून माहीती असावी या करिता अंगणवाडीने हा उपक्रम राबविला या उपक्रमाकरिता व्याहाडखुर्द च्या सरपंच सुनिता उरकुडे, बालपणती गृपच्या रोहीणी साखरे अंगणवाडी सेविका रंजिता देहलकर मिना मस्के,दर्शना चिलमुलवार,भावना जुनघरे,प्रीया फाले,लता आत्राम,आशा वर्कर ममीता बांगरे,महिला वर्ग व बालगोपाल उपस्थीत होते.