जिल्हा प्रतिनिधी :-अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही
आपल्याही आपण राहतो त्या समाजाला काही तरी देण्याची भावना असल्याने छत्रवाणी परीवाराने अनोख्या पध्दतीने समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकांचा सत्कार करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही येथील बलराम छत्रवाणी याने आपल्या आई भगवती गुलाबचंद छत्रवाणी हिचा ८५वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची कल्पना आली. त्यामुळे काहीतरी विशिष्ट पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी तालेवार सभागृहात अनोखा कार्यक्रम आयोजित केला . त्यामध्ये शहरातील आपल्या सर्वांचा कचरा वाहून नेणाऱ्या स्वच्छता दुताचा सत्कार आयोजित करून समाजापुढे आदर्श निर्माण केला, यामध्ये शहरातील स्वच्छतेची सेवा देणाऱ्या ५५स्वच्छता दुत सफाई कर्मचारी, नगरपंचायत घंटा चे चालक, सुपरवायझर, महिला सफाई कर्मचारी याचा व तसेच निस्वार्थपणे अनेक वर्षे पासून स्वतः सेवा देणारे बावणे पिता पुत्राचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष मयुर सुचक, नगरसेवक युनूस शेख यांच्या सेवा कार्याची दखल यावेळी घेतली.
यावेळी छत्रवाणी परिवाराच्या वतीने सर्वांना ट्राँफी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार केला. छत्रवाणी परिवार नेहमी समाज उपक्रम राबवित असतात. उन्हाळ्यामध्ये आठवडी बाजारात थंड पाण्याची व्यवस्था करून बाहेरून येणाऱ्यांची तृष्णा भागवत असतात. शहरातील अनेक उपक्रमात आपल्यापरीने नेहमी सढळ हाताने मदत करीत असल्याने अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र होताना दिसुन येते आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसांच्या सत्कार कार्यक्रमानंतर शहरातील शांतीभुवन हॉटेल मध्ये सर्वांना स्वरुची भोजन देण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सिंधी समाजातील कुटुंब, बलराम छत्रवाणी परिवार, गोल्ड बिसेन, संदिप बांगडे, युनुस शेख, जाहिद पठाण, चांद शेख, यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला.