सांघिक खेळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळते.:-अरविंद जैस्वाल

 

जिल्हा प्रतिनिधी

अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

 सिंदवाही शालेय जीवनात सांघिक खेळाचे एक अनन्यसाधारण महत्व असून या माध्यमातून त्यांच्या शारीरिक अवयवांचा विकास होऊन शरीर सुदृढ बनते आणि आपले आरोग्य चांगले राहते आणि या बरोबरच त्यांचा शारीरिक विकासाला चालना मिळत असल्याचे मनोगत माजी सभापती प समिती सिंदेवाही तथा सचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही चे अरविंदभाऊ जैस्वाल यांनी व्यक्त केले. ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि तालुका क्रीडा समिती सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सत्र 2023-24 अंतर्गत आयोजित तालुका स्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटक म्हणून बोलत होते 

  सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालय प्रांगणात भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील विविध शाळेनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उदघाटन सन्मा. अरविंदजी जैस्वाल सचिव सर्वोदय शिक्षण मंडळ, सिंदेवाही यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य बोरकर सर तालुका क्रीडा संयोजक धनंजय मोगरे सर,कैलास मेश्राम सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनय खोब्रागडे यांनी केले तर आभार सुनील पेंदाम सर यांनी मानले स्पर्धा पार पडण्याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले.