राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
दिनांक १० मे २०२५
सावंगी (ता. देसाईगंज) : डॉ.भदंत सावंगी मेधंकर स्मृती प्रतिष्ठान प्रेरणाभूमी, सावंगी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य होते पूज्य भदंत डॉ. सावंगी मेधंकर यांच्या २४ व्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, “प्रेरणाभूमी महाविहार” च्या प्रथम वर्धापन दिनाचे उत्सव आणि विशेष स्मरणिकेच्या प्रकाशनाचा समारंभ.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करून दिले तसेच भदंत सावंगी मेधंकर यांच्या सामाजिक, धार्मिक व बौद्ध कार्यावर प्रकाश टाकत पुढील पिढीला दिशा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी उपस्थीत अध्यक्ष प्रेरनाभूमी काशिनाथजी मेश्राम बुद्धभूमी खैरी, नागपूर.भदन्त प्रज्ञाज्योती महाथेरा, सरपंच सावंगी. प्रभाताई ढोरे,उपसरपंच सावंगी.सुमंतजी मेश्राम, भदंत अश्वघोष ,डॉ बाबा वाणी, नीरज बोधी,अरुण गाडे,डॉ.चंद्रशेखर बांबोळे, इंजी.विजय मेश्राम, इंजी.सुनील आमटे,विजय बनसोड,विमलताई आळे,प्रकाश बनसोड, सुगत रामटेके, भदंत महामोग्गल्यायन, उपस्थित होते.





