ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कूल (सीबीएसई) साकोली येथे १० दिवसीय उन्हाळी शिबीराचे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या भारती व्यास, प्रमुख उपस्थती डॉ.जितेंद्र कुमार ठाकूर, रवी रंगारी धनुर्विद्या प्रशिक्षक, राहुल आवरकर व संगीता दीदी ध्यान साधना प्रशिक्षक, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोदीचोर उपस्थित होते.
विद्यार्थ्याच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक तसेच सर्वागीण विकासाकरिता उन्हाळी शिबीर अत्यंत आवश्यक असून स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी यातून तयार होणार, तसेच इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी हा प्रत्येक स्पर्धेत टिकेल व शाळेचे नाव मोठे करेल व हे सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी उन्हाळी शिबीर उपयुक्त असते असे प्रतिपादन प्राचार्या भारती व्यास यांनी केले.
उन्हाळी शिबीरातील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रवासात उपयोगी पडेल. या उन्हाळी शिबीरामध्ये आत्म संरक्षणासाठी लाठी काठी व कराटे, ध्यान साधना, विविध मानसिक, बौद्धिक, शारीरिक, मनोरंजनात्मक, कलात्मक व मैदानी खेळांचे कला कौशल्य मुलांनी आत्मसात केलीत. रवी रंगारी यांनी धनुर्विद्या अंगीकृत करण्याविषयी विशेष माहिती दिली.
ध्यान साधना व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे याचे अनन्य साधारण महत्व राहुल आवरकर व संगीता दीदी यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



