शेवटी युद्धविराम…
कोणत्याही देशातील सर्वसामान्य जनतेला युद्ध नकोच आहे!
कारणे कोणतीही असू द्या..
कारण,या युद्धाचा परिणाम केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागतो!
वीर जवानांना हळदीच्या अंगाने शहीद व्हावे लागते….
आणि सर्वसामान्य जनतेला मात्र……
महागाई……..
बेरोजगारी……..
निरपराधांचा हकनाक बळी……
स्वतःच्या डोळ्याने आप्तस्वकीयांचे,मित्रांचे मरण पाहावे लागते.
इतर सर्व वर्ग मात्र…….
राजकीय नेते, सत्ताधारी, विरोधक, त्यांच्या खोट्या राष्ट्रवादाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला मात्र भावनिक साद घालून देशासाठी सर्वस्वी त्याग करण्याचे आवाहन करतात!
त्यासाठी पी.एम.फंडात,सी.एम.फंडात पैसे टाकण्याचे आवाहन करतील.
परंतु ,स्वतःच्या भ्रष्टाचाराने देशाला व आम्हालाच लुटून कमविलेल्या पैसा मात्र सुरक्षित ठेऊन खोटा देशाभिमान जागृत ठेवण्याचा बहाणा करतील.
आज रोजी एकही देश असा नाही की, त्या देशाकडे युद्ध तयारीसाठी प्रचंड प्रमाणात पैसा आहे…
मग हा खटाटोप कशासाठी?
ठीक आहे,कुणाच्यातरी विकृत मेंदूतून निघालेल्या विकृतीमुळे जागतिक शांतता भंग पावत असेल, तर त्याची नांगी ठेचलीच पाहिजे.
परंतु ,अजूनही जगाने विशेष करून अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रांस आणि चीन या UNO च्या स्थायी सदस्य देशांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अतीविनाशापासून धडा घेतलेला दिसत नाही. तसे असते तर रशिया – युक्रेन, इराण -इस्रायल, भारत – पाक, आर्थिक महासत्ता बनण्याचे युद्ध म्हणजे चीन – अमेरिका, दक्षिण कोरिया / अमेरिका – उत्तर कोरिया.अशी खुमखूमी निर्माणच झाली नसती……!
एक दिवस प्रत्येक देशांची अर्थात जगाची ही 5% टक्के सत्ताधारी औलाद आम्हाला म्हणजेच वीर जवानांना,सर्वसामान्य जनतेला आणि या पृथ्वीला कायमचे नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत.
आणि हे जर टाळायचे असेल,तर त्यासाठी सर्वसामान्य जनतेने या सत्ताधारी आणि व्यवस्थेच्या मानवी कल्याणाच्या चांगल्या कामाचे अभिनंदन करावेच….
परंतु ,भ्रष्टाचार ,अन्याय -अत्याचार,महागाई,बेरोजगारी यांच्या विरोधात मात्र त्यांना जाब विचारण्यासाठी जनतेने सतत जागृत राहिलेच पाहिजे…
कारण,शेवटी…….
लोकशाही ही,जनतेनेच जनतेसाठी,जनतेनीच निर्माण केलेली व्यवस्था आहे….
कोणत्याही कुटनीतीचा अवलंब करणाऱ्या अनौरस औलादीच्या राजकीय नेत्यांसाठी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या भ्रष्ट सनदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अजिबात नाही!
म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही,भारताच्या संविधानाला समजून घ्या,कोणत्याही धर्माचे आदेश एक वेळ ऐकू नका…..
परंतु,मानवता धर्माचा अविष्कार करणाऱ्या व त्याचा पवित्र ग्रंथाचा आदेश अर्थात भारतीय संविधानाचा आदेश मात्र जरूर पाळा…..
शेवटी एकच सांगतो…….
” हजारो साल पहेले की बात थी……
जब ये जम्बूद्विप मे खून की नदिया बहाई थी,हजारो लोग मारे गये थे,सम्राट अशोक ने भी खून की नदिया बहाई थी, पहले और दुसरे विश्व्युद्धमे भी खून की नदिया बहाई थी……
लेकिन भारत और विश्व् को एक दिन अपना सर “बुद्ध के चरणो मे ” लाकर…….
झुकना पडा….!,झुकना पडा…..!!,झुकना पडा…….!!!
शेवटी,भारताने सुद्धा 1974 मध्येच बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालीच…….
” आणि बुद्ध हसला… “
या ब्रीद वाक्याने स्वसंरक्षणासाठी पोखरण येथे अनुचाचणी केली होती.हे ब्रीद सुद्धा वापरणे किती योग्य आणि किती अयोग्य हे मी वाचकांच्या आकलन क्षमतेवर सोडतो….
आणि आज सुद्धा भारत – पाकिस्तान युद्धाचा शेवट सुद्धा आणि त्याची बोलणी करार सुद्धा,”बुद्ध पौर्णिमेच्या,
दिवशीच होत आहे हे सुद्धा अभिनंदनियच आहे.कारणे काहीही असोत…….
जागृतीचा कृतिशील लेखक..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर,7875452689…



