क्वाॅडिनेटर आकाश आनंद बहुजन समाज पार्टीचे उत्तराधिकारी.. — देशभरातील पदाधिकाऱ्यांच्या समिक्षा बैठकीत बसपा सुप्रिमो बहन मायावती यांचा निर्णय सार्वजनिक…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

            बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी आज लखनऊ येथील बसपाच्या सर्वोच्च कार्यालयात देशातील सर्व पदाधिकाऱ्यांची समीक्षा बैठक बोलावली होती.

           या बैठकीत बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी आकाश आनंद यांना बसपाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले व आपला निर्णय देशभरातील बसपा पदाधिकाऱ्यांपुढे सार्वजनिक केला.

             बहन मायावती यांनी उत्तरप्रदेश व उत्तराखंड या दोन राज्याची जबाबदारी आपल्याकडे ठेवली तर आकाश आनंद यांच्याकडे संपुर्ण भारतातील राज्यांची जबाबदारी दिली व त्यांचे पक्षातंर्गत सर्व निर्णय अंतिम असतील असेही स्पष्ट केले.

         बसपा क्वाॅडिनेटर आकाश आनंद हे वयाच्या २२ व्या वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाले होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण उत्तरप्रदेश मधील गुडगाव येथे झाले.बाकीचे शिक्षण लंडन येथे घेतले आहे.त्यांनी मास्टर ऑफ बिझनेस आॅडमिनिस्ट्रेशन(एमबीए) ची पदवी २०१७ ला मिळवली आहे.ते बसपाचे क्वाॅडिनेटर म्हणून राजकारणात सक्रिय होते.

               आज लखनऊ येथे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत व पुढील काळातील पक्षाची वाटचाल यासंबंधाने देशभरातील बसपा पदाधिकाऱ्यांची समीक्षा बैठक बोलावली होती.

            या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व ५ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.

            उत्तराधिकारी आकाश आनंद हे पुढील काळात बसपाच्या मजबूतीसाठी व देशातील नागरिकांसाठी काय निर्णय पक्षातंर्गत घेतात याकडे देशातील बसपा पक्ष पदाधिकाऱ्यांचे,कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.