कत्तलीसाठी जाणारे 27 जनावरे सिंदेवाही पोलिसांनी पकडले…

जिल्हा प्रतिनिधि

अमान क़ुरैशी

सिंदेवाही

       आज दिनांक 10/10/U 2023 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजी चौक ते देवयानी शाळा सिंदेवाही याठिकाणी पाठलाग करून अवैध जनावर वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक AP 29 U 9219 अंदाजे किंमत 10,00,000/- पकडला असता ट्रक चालक व त्याचा साथीदार पळून गेला त्यानंतर ट्रक ची तपासणी केली असता 27 नग गोवंश अत्यंत क्रूरपणे पाय बांधून कत्तलीसाठी कोंबून नेत असल्याचे दिसून आले.

       टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक AP 29 U 9219 अंदाजे किंमत 10,00,000/- व 27 नग बैल अंदाजे किंमत 2,70,000/- असा एकूण 12,70,000/- किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद झाला असून पिढीला तपास सुरू आहे. 

        सदरची कार्यवाही ठाणेदार तुषार चौहान यांचे मार्गदर्शनाखाली Psi सागर महल्ले, सह फौजदार विनोद बावणे, पोलिस हवालदार देवा सोनुले, गेडेकर, यांनी केलेली आहे.