लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांच्या दर्शन प्रसंगी,विकास कामासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केली.

नीरा नरसिंहपूर दिनांक:10

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार 

       लुमेवाडी तालुका इंदापुर येथील तिर्थक्षेत्र हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांच्या दर्गाह परीसरात निवारा शेडसाठी 50 लाख व आकलाई बंधारा ते दर्गाह पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी 50 लाख असे एक कोटींच्या निधीची घोषणा माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केली.

     लुमेवाडी ( ता. इंदापूर ) येथील हाजी हाफिज फत्तेह मोहंमद जोधपुरी बाबांच्या 30 व्या उरूसा निमीत्त दर्गाहला भेट व प्रार्थना प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, सुरेश शिंदे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, सरपंच पोपट जगताप, संतोश सुतार, सुदर्शन बोडके आदि मान्यवर उपस्थित होते.

    आमदार भरणे पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज बांधवासाठी निधी आणणारा बहुतेक पहिला आमदार आहे. माझे तालुक्यात बारीक लक्ष आसून माझा स्वभावच जरा वेगळा आहे. कुणी मागेल तेव्हा देण्यापेक्षा मागण्या अगोदर देणारा मी कार्यकर्ता आहे. कामे तर सगळीच करतात पण सर्वसामान्यांमधून भविष्यात नाव निघेल आसे काम करणारा मी आहे. तालुक्याच्या राजकारणातून चांगली माणसं जर बाजूला गेली तर मात्र तालुक्याचे न भरून येणारे नुकसान होईल. मी काम करत आसताना आम्हाला समाधान देण्याचे काम सर्वसामान्या बरोबर स्थानिक नेते मंडळींनी करणे गरजेचे आहे. 

    यापूर्वी सराटीकडून येणारा रस्ता, पिंपरी बुद्रुककडून येणारा रस्ता तसेच अकलूजकडून येणाऱ्या रस्त्यासाठी तसेच तालीम व ग्रामपंचायत कार्यालयाला निधी दिलेला आहे. यापूर्वीच्या काळी रस्ता व मागासवर्गीय वस्त्यामधील गटारीची काय अवस्था होती. दर्ग्याला येण्यासाठी किती खस्ता खाव्या लागत होत्या. तालुक्यातील अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाजाबरोबर माया बहिणीच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी रात्रंदिवस काम करणारा मी कार्यकर्ता आहे. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कधी मी जातीचा, पातीचा, लांबचा, जवळचा विचार केला नाही. येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान करण्याचे काम मी आजपर्यंत करत आलो आहे. त्यामुळे न मागता काम करतो पण तुम्ही सुद्धा न चुकता माझे काम केले पाहिजे.

    दरम्यान हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांच्या उरूसानिमीत्त त्यांच्या मजारवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी चादर चढवून दर्शन घेऊन तालुक्यातील जनतेला सुख, समाधान ठेवण्याची तसेच समाधानकारक पाऊस पाडूण धन, धान्याची चांगली उगवण होण्याची प्रार्थना केली.

चौकट 

मागील निवडणुकीत येथील मतदारांची व आमची चुक झाली असून यापुढील निवडणुकीत सुधारण्यात येईल असा शब्द माजी सरपंच हाजी उस्मान शेख यांनी बोलताना दिला.