दारुबंदी काळात चिमूर तालुक्यात खरोखरच दारु मिळत नव्हती काय? भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना प्रश्न? — “रक्षाबंधन!.. अभ्यंकर मैदान चिमूर,सन २०२३… भाग – १ क्रमशः …..

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

           भाषण देणे व मतदारांना आकर्षित करणे हा प्रत्येक राजकीय पक्षांचा शाब्दिक खेळ असतोय.कोण,केव्हा,कसे,वक्तव्य करेल याचा नेम राहातं नाही याचे प्रत्यंतर चिमूर येथील अभ्यंकर मैदानावर पार पडलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्ताने आले.

             चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम निमित्ताने उपस्थित हजारो महिला भगिनींना उद्देशून मार्गदर्शन करताना भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ ह्या म्हणाल्या होत्या की चंद्रपूर जिल्हातंर्गत दारुबंदी काळात चिमूर तालुक्यात दारु मिळत नव्हती.

             मला वाटते भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना कुणी तरी चूकीची माहिती दिली असावी. दारुबंदी काळात,” चिमूरसह चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात,”गाव तिथे मुबलक प्रमाणात दारु मिळत होती व तेही जास्त भावाने मिळत होती, हे प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना कुणी का म्हणून सांगितले नाही?हा मुद्दाच रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्ताने चिमूर तालुक्यातील महिला भगिनींना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. 

           रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनी चित्राताई वाघ यांच्या दारुबंदी मुद्यांवर पुरत्या गोंधळून गेल्या होत्या असे त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे बघितल्यावर स्पष्ट लक्षात येते.

           तद्वतच दारु बंदी काळात चंद्रपूर जिल्ह्यात जिथे तिथे दारु मिळत होती हे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना कुणी कसे काय सांगितले नाही? भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात परत दारूबंदी करून पुन्हा जास्त भावाने दारु विक्री कराणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींचे रस्ते खुले करु नका किंवा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या नावावर गुन्हेगारी वाढवू नका म्हणजे ठिक!..

           भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना स़बंधितांकडून माहिती द्यायला पाहिजे होती की,”दारुबंदी काळात चिमूरसह चंद्रपूर जिल्ह्यात शतप्रतिशत दारुबंदी करण्यास तात्कालिक भाजपा सरकार व त्यांचे तडफदार मंत्री व आमदार सुध्दा अपयशी ठरले होते.

             याचबरोबर भाजपा सरकार काळातील चंद्रपूर जिल्हातंर्गत दारूबंदीच्या अयशस्वी गाथेची चित्राताईंनी त्यांच्या विश्वासू व्यक्तींकडून माहिती घ्यायला पाहिजे होती या मताचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक आहेत..

              १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारुचे प्रमाण,वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करूनच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय महाराष्ट्र शासनाद्वारे मागे घेण्यात आला असे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले होते.

          अर्थात महाराष्ट्र शासनाद्वारे सा़ंगण्यात आले होते की,दारूबंदी काळात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली होती..

              भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तुम्हाला खरोखरच दारुबंदी करायची आहे काय? मग!.. आता तर महाराष्ट्र राज्यात तुमचेच मित्रपक्षांचे सरकार आहे आणि उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांना खूप महत्त्व आहे असे जनतेला नेहमी सांगितल्या जातय.म्हणूनच अख्या महाराष्ट्र राज्यात दारु बंदी करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवे़द्र फडणवीस यांच्या सोबत लिखीत स्वरुपात पत्रव्यवहार करून त्यांना तुम्ही अवगत करा ना?

           आणि तुम्ही बघाच!,”अख्या महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे दारूबंदी करतात काय? भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तुम्हालाही दारूबंदीचे खरे वास्तव व त्यातील राजकीय डावपेचांचा खेळ माहिती नसावा असे होत नाही.

           महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारची दारुबंदी झाल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी होवूच शकत नाही,याचा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दारूबंदी काळात पुरता आलेला आहे ना?आ‌.चित्राताई,!….

                  कुठल्याही सभेला संबोधित करताना वास्तव्याची जाणिव करून न घेता प्रदेश स्तरावरील नेता एखाद्या विषयावर अयोग्य भाष्य करीत असेल तर तो नेता भर सभेत हरतोय आणि आपल्या आमदारालाही हरवतो याचा प्रत्यय बऱ्याच ठिकाणी आलेला आहे.

            मात्र हा प्रत्यय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्ताने चिमूरच्या इतिहासिक अभ्यंकर मैदानावर आलाय हे सत्य नाकारता येत नाही.