बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या क्रूर हत्या प्रकरणाची महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घ्यावी.. — चिमूर तालुका समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना,गृहमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन.. 

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

       नांदेड जिल्हा अंतर्गत बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांची हत्या म्हणजे जातीयवादी मानसिकतान्वये करण्यात आलेले जहाल क्रूर कृत्यच.

       पुरोगामी महाराष्ट्र राज्यातंर्गत नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम यशस्वी पार पाडला म्हणून अक्षय भालेराव या कर्तबगार युवकाची हत्या जातीयवादी मानसिकतान्वये करणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे होय व गुंड प्रवृत्तीला चालना देणे होय.

      म्हणूनच समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या भयानक अशा जहाल बेकायदेशीर अत्याचार कृत्तीला वेळीच पायबंद घालणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जलदगती न्यायालयातंर्गत प्रकरण लवकर निकाली काढण्या सबंधाचे निवेदन तहसीलदार चिमूर यांच्या द्वारा,”चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवले आहे. 

      बोंढार हवेली येथे १ जूनला गावातीलच लग्न सोहळ्याचा बाहाना पुढे करीत तेथील जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंड्यानी सायंकाळच्या सुमारास मनातील द्वेष व राग अश्लील व जातीवाचक शब्दांन्वये ओकत अक्षय भालेराव यांचा खून किराणा दुकानापुढे धारधार शस्त्राने केला असल्याचे प्रकरण महाराष्ट्र राज्याला विचार करायला लावणारे आहे.

         अक्षय भालेराव खून प्रकरणातील गावगुंड हे अयोग्य कायदेशीर कारवाईमुळे सुटणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ सिंदे यांनी घ्यावी,अशा प्रकारची विनंती त्यांना चिमूर समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

       याचबरोबर सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार,चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आले आहे.

       निवेदन पत्रावर सह्या करणाऱ्यांमध्ये निलकंठ शेंडे,भागवत बोरकर,अरविंद मेश्राम,सुधाकर पाटील,दिगांबर बोरकर,नरेश पिल्लेवान,श्रिदास राऊत,किशोर जांभुळकर,किशोर गेडाम,राहुल लोणारे,सचिन गजभिये,राजेंद्र मेश्राम,गणेश कोडापे,नवीन मेश्राम,प्रविण गजभिये, हेमंत राऊत व इतर समता सैनिक दल पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.