राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदीत वारकऱ्यांना अन्नदान…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी भाविक भक्तांना अन्नदान वाटप करण्यात आले.

       सदर अन्नदानाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी डी.डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सतीश कुऱ्हाडे, आरिफ शेख, माजी महिला अध्यक्षा पुष्पाताई कुऱ्हाडे, राष्ट्रवादी महिला पुणे जिल्हा सरचिटणीस रूपाली पानसरे, राणी रंधवे, दमयंती कुऱ्हाडे, या मान्यवरांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले.