राजकीय सत्ता जेंव्हा धर्माधिष्ठित होते,तेव्हा तो देश अराजकतेकडे वेगाने वाटचाल करत असतो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी सुमारे पाऊणेदोनशे वर्षांपासून ब्युर्बोन घराण्याचे राज्य होते. त्या घराण्यातील प्रत्येक पिढीच्या राज्यभिषेकावेळी पोपच्या हस्तेच तो राजमुकुट डोक्यावर चढत असे.याच घराण्यातील 16 व्या लुईच्या काळात धार्मिक अमीर,उमराव यांचेकडे निर्माण झालेल्या राजसत्तेमुळे गरीब आणि श्रीमंतीची भयानक दरी निर्माण झाली.
95 टक्के जनतेकडे 5% राष्ट्रीय संपत्ती,आणि 5% जनतेकडे 95% राष्ट्रीय संपत्ती.एवढी दरी निर्माण झाल्याने फ्रांसमध्ये,”मोन्टेस्कीयू, रुसो,दीदेरो,व्हाल्टेअर,यांच्यासारख्या लोकशाहीवादी विचारवंतांनी 95 % जनतेचे वैचारिक आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारून जनतेसोबत रस्त्यावर उतरले.आणि बॅस्टीलच्या तुरुंगात विनाकारण डांबलेल्या कैद्यांची सुटका करून संपूर्ण जनता राजवाड्यावर चालून गेली.
अमीर,उमराव,लुई यांना पकडून फासावर लटकावण्यात आले. काही काळातच अराजकतेनंतर ही रक्तरंजित मार्गाने फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाली.पुढे असा इतिहास घडला की,”स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुता,ही लोकशाही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी म्हणून अजरामर झाली.
तलवारीच्या आणि बंदूकीच्या बळावर लोकशाही मूल्ये रूजवता येत नाहीत.
—– सॉक्रेटीस…..
म्हणून फ्रेंच राज्यक्रांती जरी यशस्वी म्हणून अजरामर झाली असली, तरी तीचा शेवट होऊन त्या अराजकते मधुन पुन्हा एकदा नेपोलियन बोनापार्टच्या रूपाने हुकूमशाही अस्तित्वात आली.
फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर,वरील वैचारिक नेतृत्व केल्यानंतर त्या विचारवंतांनी संपूर्ण लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत आपले नेतृत्व टिकवून ठेवायला पाहिजे होते.परंतू त्यांनी त्यातून अंग काढून घेऊन ती पुढील जबाबदारी जनतेवर सोडल्याने जनता सैरभैर झाली.आणि या अराजकतेचा लाभ नेपोलियन बोनपार्टने उठवला आणि पुढे तो सम्राट बनला.म्हणून फ्रांस पुन्हा एकदा लोकशाहीला मुकला.
फ्रेंच राज्यक्रांती नंतर निर्माण झालेल्या अराजकतेला थांबवण्यासाठी, शत्रू राष्ट्रावर वचक बसवण्यासाठी नेपोलियनने हातात तलवार घेतली आणि सर्व परिस्थिती हाताळली.तेव्हा कुठे तो फ्रांसचा सम्राट बणून गादीवर बसला.
राज्यभिषेकावेळी पोपच्या हस्ते राजमुकुट डोक्यावर चढवण्याच्या परंपरेला त्याने छेद दिला. त्याने पोपच्या हातातून तो राजमुकुट घेतला आणि तलवारीच्या टोकावर धरून तसाच डोक्यावर चढवला!
यातून त्याने हे स्पष्ट केले की हे राज्य मी तलवारीने जिंकलेले आहे. यावर मी धर्माला अजिबात स्थान देणार नाही. असा अप्रत्यक्ष अपमान त्याने पोपचा अर्थात धर्माचा केला होता.पुढे अवघ्या 10 ते 15 वर्षातच नेपोलियनचा झंझावात इंग्लंड व रशियाने संपवला. नंतर पुढे सुमारे 100 वर्षानंतर फ्रांसमध्ये पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लोकशाही वारे वाहून फ्रांस आज एक लोकशाहीवादी देश म्हणून उदयास आलेला आहे.
मात्र,आमचा भारत देश सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपासून एका कुसांस्कृतिक मनुवाद्यांच्या गुलामीत खितपत पडलेला आहे. या काळात जवळपास *त्रेचाळीस राजकीय आक्रमणे भारतावर झाली आणि निघूनही गेली.परंतू हे आर्याचे कुसांस्कृतिक आक्रमण हजारो वर्षानंतर मात्र आजही पाय रोऊन उभे आहे!
मध्यंतरीच्या काळात 1947 ते 1950 इंग्रज निघुन गेल्यावर या कुसंस्कृतीला भारताच्या संविधान निर्मितीने मोठा हादरा बसला.त्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 लाच महाड येथे मनुस्मृती दहन हादरा दिलेलाच होता.
परंतू गेल्या 75 वर्षात आमच्या बुद्धीजीवी वर्गाने महापुरुषांच्या क्रांतीचे वैचारिक भांडवल करून त्या क्रांतीची क्रूर चेष्टा केल्याने आमच्या महापुरुषांना जिवंतपणीच शेवटच्या काळात नैराश्य आले,आणि त्यातच त्यांचा शेवट झाला.
म्हणूनच की काय सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू म्हणतात, ‘ या देशातील न्याय व्यवस्थेत कसा खेळ चालू आहे,तो जर जनतेला कळला,तर या देशात सुद्धा फ्रेंच राज्यक्रांती घडू शकते.
परंतू,काटजू सर माझे स्पष्ट मत आहे की,या देशात क्रांती होऊच शकत नाही.घाबरण्याचे काहीही कारण नाही!
कारण हा देश गुलामांचा देश आहे.त्या गुलामीचा यांना फार मोठा गर्व आहे.एक वेळ या देशातील गुलाम गाऊन घालून बांगड्या भरून टाळ्या पिटायला एका पायावर तयार होतील.
परंतू मूलभूत हक्काच्या स्वातंत्र्यासाठी मोदी / शहाच्या अन्यायाच्या विरोधात मान सुद्धा वर करणार नाहीत.
एवढा गर्व या गुलामांना गुलामीचा आहे.या गुलामात माझा ( लेखकाचा ) समावेश अजिबात नाही….
तुमचा नसेल तर,रस्त्यावर उतरून EVM आणि SIR सहित सर्वच अन्यायकारी कायद्याविरुद्ध रस्त्यावर उतरा…..



