याशिवाय पर्याय उरलेला नाही.
लोकप्रतिनिधी,प्रशासकीय सनदी अधिकारी आणि त्यांचे प्रशासन,न्यायालय,पत्रकारिता ( सर्व प्रकारची माध्यमे ), थोडक्यात कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ व पत्रकारिता या सर्व,”संविधानिक संस्था, आणि बुद्धीजीवी वर्ग यांनी जनतेच्या हतबल अज्ञानाचा, धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा,दारिद्र्याचा लाभ उठवत भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व घालवून टाकून खोट्या हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याची मिजास यांची झालेली असल्याने,आता या सर्वांच्या विरोधात…….
जनतेनीच आता हातात एकीचे बळ तयार करून कोणत्याही राजकीय पक्षांच्या बहकाव्यात न येता संविधानिक लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे ते सुद्धा कोणत्याही प्रकारच्या मतभेदाशिवाय.
कारण जनता की अदालत जगात सर्वात महान आहे.हे अमेरिकन,फ्रेंच,रशियन राज्यक्रांतीने दाखवून दिले आहे!
यावर कुणीही अशी नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नये की आपल्या देशात हे शक्यच नाही, कोण रस्त्यावर येईल?
तुमच्या सारख्याच्या अशा नेभळट मानसिकतेमुळेच रस्त्यावर उतरण्यास तयार असणारी मंडळी पुन्हा घरात जातात. त्यामुळे तुम्ही ( अशी नकारात्मकता पेरणारी मंडळी ) घरातच बांगड्या घालून साडी, गाऊन घालून बसा आणि तुमच्या बायका म्हणजे आमच्या माय, माऊली आणि भगिनींना रस्त्यावर आमच्या सोबत पाठवा.आमच्या भारतीय नारीत एवढी शक्ती आहे की ती पुरुषांशिवाय सर्व महापुरुषांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करू शकेल. आजपर्यंत त्या मनूने मनुस्मृतीतुन तीला अतिशूद्र म्हणून हीनवले नसते तर आमच्या देशावर कुणाचे परकीय आक्रमण करण्याची हिम्मत झाली नसती…..!
म्हणून आता यापुढे देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आमच्या माता, भगिनी, मुलीच रस्त्यावर उतरून क्रांतीचे चक्र हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.
कारण हीच खरी संविधानिक ऊर्जा आहे……..



