राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कोरची तालुक्यामध्ये 4 दिवसापासून तेंदुपत्ता तोडण्याचे काम सुरू झाले आहे.आज दिनांक 9 मे 2026 रोजी शनिवार ला पहाटे भीमपूर व कोरची परिसरातील बोडेना जंगलामध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी महिला व पुरुषवर्ग गेले होते. पण जंगलात जंगली डुकरांचा हल्ल्यामध्ये दोन पुरुष व एक महिला जख्मी झाली आहे.
त्या मध्ये नंदकिशोर बोरकर वय 54 वर्ष भिमपुर याला डाव्या हाताला जबर मार लागलेला आहे तर कृष्णाजी पडोटी वय 60 रा कोरची याला दोन्ही पायाला मार लागलेला आहे. सौ. पुष्पाताई कालिदास भैसारे वय 40 वर्ष कोरची या महिलेला छाती जवळ मार लागलेला आहे.
रानडुकराच्या हल्ल्यामध्ये तिघेही जखमी झाले तिघाही लोकांनी जीव वाचविण्या साठी आरडाओरडा केल्यामुळे सोबत असलेले लोक धावून आले व सोबत असलेले कुत्र्यांनी त्या रानडुकराचा पाठलाग करून पळवून लावले. त्यामुळे नंदकिशोर बोरकर चा जीव वाचला असे बोरकर यांनी सांगितले. बोरकर जखमी अवस्थेत सोबत असलेल्या लोकांनी कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या तिघांनाही डॉ.आशिष विटणकर वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टर कुणाल सरदार यांनी उपचार करून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
वनविभागाला माहिती प्राप्त होताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बेडगांव एस.व्ही. नारनवरे, क्षेत्र सहायक डी.आर. ढोरे कोरची, वनरक्षक मसेली आर. आर .गुंजापडगू , ए.एम. गावडे, एन.एस. गावळे , यांनी ग्रामीण रुग्णालयात भरतीय असलेल्या जखमी महिला व पुरूष रुग्णाची भेट घेऊन चर्चा करून पंचनामा करण्यात आला.
जखमी महिला पुरुषांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.



