राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वतीने शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक परिवर्तनाची मोहीम सूरू करण्यात आली आहे सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण,कूटूंब प्रबोधन,स्वआधारित जिवन व नागरीकांचे कर्तव्यबोध या पंच परिवर्तणाकरीता जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहीमेत सर्व हिंदू बांधवांनी जातीभेद विसरत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा यांनी केले.
हिंदू समाजाचा जागृती करीता सनातन धर्म, सनातन संस्कृती व सामाजिक एकतेचा संकल्पाकरीता तालूक्यातील सोनसरी येथे सकल हिंदू समाज सोनसरी मंडल यांचा वतीने हिंदू सम्मेलनाचे आयोजन काल गूरूवार रोजी करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना घिसूलाल काबरा बोलत होते.याप्रसंगी मंचकावर दत्तात्रय क्षीरसागर महाराज व बोधनजी मंगर महाराज उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी गावाचा प्रवेशद्वारापासून दिंडी व भजनाचा तालावर तसेच महिला व बालीकांचा डोक्यावर कलश घेऊन कलश यात्रा कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली.
यावेळी पूढे मार्गदर्शन करताना घिसूलाल काबरा यांनी सांगितले की सामाजिक समरसता अंतर्गत समाजातील भेदाभेद नष्ट करने,पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवत पर्यावरण संरक्षण,जिवनाचा धावपळीत कूटूंब व्यवस्था धोक्यात आली आहे त्यामुळे कूटूंबाकडे सूद्धा लक्ष देत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.राष्ट्राचा प्रगतीकरीता स्वदेशीचा पूरस्कार करीत स्वआधारित जिवन जगणे ही काळाची गरज झाली आहे.
तसेच संविधानाचे पालन करणारा जबाबदार नागरिक बनवने या पंचपरिवर्तणाचा मोहीमेत हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कूरखेडाचे माजी नगराध्यक्ष,प्रतिष्ठित नागरिक रविंद्र गोटेफोडे यानी तर आभारप्रदर्शन नंदकिशोर दहिकर यांनी केले.
यशस्वीतेकरीता सचिन दहिकर,वामन बोरकर, रामचंद्र राणे,योगानंद फरांडे,केशव शिवणकर, रमेश समर्थ, दामोधर अष्टेकर, गुणवंत धकाते, आनंदराव दहिकर, ज्ञानेश्वर मासरकर,सूभाष प्रधान, देविदास प्रधान,माधव दहिकर,आबाजी बोरकर,केशव वालदे,हीरालाल किरसान, दामोधर बोरकर, रमेश फूलबांधे,सूधाकर शेंडे,राजू हरडे,राजू रामटेके,सूनिता बोरकर,विधाता हरडे,वंदना दहिकर,विमल दहिकर,चेतणा राऊत,लता बोरकर,पायल घरत,सिमा घरत,उत्तरा कोहळे,त्रिवेणी बोरकर,मंदा बोरकर,राणी दहिकर,गिता दहिकर तसेच गावकरी मंडळींनी सहकार्य केले.



