युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
शालवन सदधम्म विहार, बडनेरा येथे भिम महोत्सवनिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
महात्मा फुले यांचे जयंतिनिमित्य 11 एप्रिलला सकाळी 9.30 वाजता भिम महोत्सव 2026 चे उदघाटन प्रा. प्रफुल कडू,सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ता,अमरावती यांचे हस्ते करण्यात येणार असून याप्रसंगी समता सैनिक दल महाराष्ट्र प्रदेश चे पदाधिकारी तसेच आंबेडकरी विचारवंत संदीप राऊत अमरावती हे उपस्थित राहतील व नंतर महात्मा फुले यांचे जयंती पर्वावर मान्यवरांचे संबोधन होईल.
12 एप्रिलला सकाळी 9.30 वाजता धम्म दिन निमित्य त्रिरत्न वंदना,भारतीय संविधान उद्देशिका तसेच नागरिकांचे अधिकार या विषयावर संदीप राऊत समता सैनिक दल,महाराष्ट्राचे पदाधिकारी हे मार्गदर्शन करतील, या कार्यक्रमाला प्रकाश बनसोड,माजी स्थायी समिती सभापती, मनपा, अमरावती हे प्रमुख उपस्थिति राहतील.
सोमवार 13 एप्रिलला दुपारी 1 वाजतापासुन महिला आणि युवा वर्गाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेअसून यात रांगोळी स्पर्धा, संगित खुर्ची, गायन स्पर्धा, तसेच इतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्याना स्पर्धेमधे भाग घ्यायचा असेल त्यांनी संस्थेच्या सदस्या उषा दादाराव इंगळे,कीर्तिताई प्रकाश बनसोड, वंदनाताई ऊके यांचेशी संपर्क साधन्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना बक्षीस वितरण 19 एप्रिल रोजी सकाळी त्रिरत्न वंदना संपल्यानंतर करण्यात येईल.
14 एप्रिलला सकाळी 8.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतिनिमित्य भंते नागसेन थेरो यांचे हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात येईल. त्रिरत्न वंदना संपल्यानंतर संस्थेतर्फे जयंतिनिमित्य प्रबोधन होईल व त्यानंतर सर्वानी अशोकनगर येथिल डॉ. आंबेडकर यांचे पूतळयाला अभिवादन करण्याचे ठरलेले आहे.
संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, उपासक, उपासिका यांनी वरील कार्यक्रमाची नोंद घेऊन, सर्वानी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व सचिव यांच्या वतीने करण्यात येत आहे.


