नवजीवन मध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा..

     ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली – नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

          या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजममिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरूवात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानाई सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर व मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी माहिती दिली. शाळेतील स्त्री शिक्षकांनी विविध भारतीय थोर महिलांचे वर्णन आपल्या शाब्दीक रुपातून त्यांचे वास्तवीक दर्शन विद्यार्थ्यांना घडवून दिले.

          संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव सौ. वृंदताई करंजेकर व शाळेचे प्राचार्य यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

             या प्रसंगी महिला शिक्षकांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.