माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वराची महाआरती…    — महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांना हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा.. 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      महाशिवरात्रीनिमित्त इंदापूर शहराचे ग्रामदैवत इंद्रेश्वराची महाआरती राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दरवर्षीच्या परंपरेनुसार मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

   नंदीध्वज पूजन, रथ यात्रा व महाप्रसादाचे आयोजन या उत्सवामध्ये केले जाते.

     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ ग्रामदैवत इंद्रेश्वर हे इंदापूर शहराचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक परंपरेचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने दरवर्षी भक्तीभावाने या उत्सवात सहभागी होत असतात. महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांना या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या.