Home Political कोणावरही टीका- टिपणी न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावरच पुढील वाटचाल करायची :-...

कोणावरही टीका- टिपणी न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावरच पुढील वाटचाल करायची :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे… — अजितदादा पवार यांचा आशीर्वाद व विचार पाठीशी असल्यामुळे श्रीराजभैय्या भरणे यांचा दणदणीत विजय… 

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

         उपमुख्यमंत्री अजितदादांचा विचार हा केवळ आठवण नाही, तो विकासाचा मार्ग आहे. जनतेने आज त्या विचारांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, आशा भावनिक शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणातून विजयी ठरलेल्या श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

                                    कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव बोरी वालचंद नगर गटातून श्रीराज भरणे यांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार सचिन धापटे यांचा ९, ७९८ मतांनी पराभव केला. या विजयामुळे बोरी गटात राष्ट्रवादीचा गड अधिक मजबूत झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तालुक्यात जनतेने नेहमीच भाषणांपेक्षा कामाला महत्त्व दिलं आहे. कोण बोलतो यापेक्षा इंदापूर तालुक्याचा कौल पाहता पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल. याबाबत कोणतीही शंका नाही. कोणावरही टीका-टिप्पणी न करता केवळ विकासाच्या माध्यमातूनच पुढील वाटचाल केली जाईल.

 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

           तालुक्यात कोणता माणूस कामाचा व कोण काम करतो, हे मतदारांनी आज पुन्हा सिद्ध केले. श्रीराज भरणे यांचा हा विजय म्हणजे दादांच्या विचारांचा, विकासाच्या बांधिलकीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे.

            श्री राज भैया भरणे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना श्रीराज भरणे म्हणाले की, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड कामातूनच करेन. हा विजय माझा नसून बोरी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि मतदाराचा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आसते तर आजचा सर्व विजय उमेदवारांचा झालेला विजय पहावयास दादांना मिळाला असता.

श्रीराज भैया भरणे यांचे निवडी प्रसंगी उद्गार…