कस्तुरबा गांधी विद्यालयातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा…

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

            राज्यात शासनाने सन २००५ व २००८ पासून कस्तुरबा गांधी विद्यालयाची निर्मिती केली आणि असे महाराष्ट्रात एकूण 43 विद्यालय आहेत.आणि या विद्यालयामार्फत अपंग घटस्फोटीत अतिशय दुर्गम भागातील पाल्यांच्या मुलांसाठी या शाळेची निर्मिती झाली. तालुक्यात ही एकच शाळा असते. पण तिथल्या मुख्याध्यापकासह सर्व कर्मचाऱ्यांना खाजगी पद्धतीने कार्यरत असून अल्प प्रमाणात मानधन मिळत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.

             यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कस्तुरबा गांधी विद्यालयाचे शिक्षक यांनी आपले निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) व पंचायत समिती या ठिकाणी निवेदन देण्यात आले. यावेळी धानोरा तालुक्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापिका दिपाली कुडमेथे, कीर्ती फुंडे, सुलोचना गाडगे सरिता वालकर सुशीला उंदीरवाडे कीर्ती उंदीरवाडे मंजुषा कुथे प्रीती बोदलकर व अनेक कर्मचारी उपस्थित होते.