सामाजीक कार्यकर्ता डॉ. इरफान अहमद यांची माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थीतीत जिल्हा महासचिवपदी निवड…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

            पारशिवनी येथील सामाजीक कार्यकर्ता डॉ. इरफान अहमद यांची आज (दि. 9) माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थीतीत जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली.

       सामाजीक कार्यकर्ता डॉ. इरफान अहमद हे पारशिवनी तालुका आरोग्य अधिकारी असताना, त्यांनी तालुक्यातील गोर गरीब जनतेला आरोग्याबाबत त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी खबरदारी घेतली.

        मात्र गेल्या काही वर्षाआधी त्यांनी शासकीय नोकरीला सोडचिठ्ठी देत, खाजगी दवाखाना शहरात सुरु केला. दवाखान्यात येणाऱ्या शेकडो नागरीकांची त्यांनी निस्वार्थपणे सेवा दिली. व अद्यापही देतच आहे. यामुळे त्यांच्या समाजकार्याचे पाळेमुळे गावा गावात खोलवर रुजलेले आहे.

       याच कार्याची दखल घेत आज सोमवारी (दि 9 अक्टुबर ) माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थीतीत डॉ. इरफान यांची जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली.

       यावेळी  तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती अशोक चिखले, सुभाष तडस, शहराध्यक्ष डुमन चकोले, पंचायत समिती सभापती मंगला निंबोने, उपसभापती करूणा भोवते . प्रदिप दियेवार . प्रकाश डोमकी .दिपक पालीवाल, श्रीधर झाडे, बापू ऊर्फ रविंद्र तरार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे युवक कॉंग्रेसचे महासचिव अफरोज खान, बबलु शेख दिपक भोयर, नावेद शेख, वैभव खोब्रागडे, गोपाल कडु. शुभम राऊत, सिद्धार्थ खोब्रागडे, प्रविण शेलारे, इमरान बाघाडे प्रामुख्याने उपस्थीत होते. डॉ. इरफान अहमद यांच्या निवडी बद्दल पारशिवनी शहरात तसेच तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.