पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी तरुण शेतकऱ्याने घातला गोंधळ…. 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे विभागीय 

खेड : भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खेड येथील कार्यक्रमात एका तरुणाने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने शेतीविषयी प्रश्न विचारुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

         विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु होत असतानाच हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला समज दिली. तसेच पोलिसांनी देखील तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात या प्रकरणावर भाष्य केलं.

           चंद्रकांत पाटील यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. संबंधित प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाची आठवण आणणारं प्रकरण आज घडलं आहे. एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी तरुणाला सुनावलं

       पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु झाल्यानंतर संबंधित प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियका सांगत असताना विरोधकांकडून सभेत गोंधळ घालण्यासाठी अशी लोकं पाठवली जातात, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

     “मुख्य वक्ता बोलत असताना प्रश्न विचारायचा आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं. माझा 45 वर्षाचा अनुभव आहे. अनेक मंत्रीपद मी पाहिलीत, मोजतो, मी तुला…”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकरी तरुणाला सुनावलं.