तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयच्या सभागृहात येथे १९१ गरजु लाभार्थीना चष्मे वाटप. — वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे लाभार्थीना चष्मे वाटप करण्यात आले.

 

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- 

       तामसवाडी येथे,”आपला आमदार आपल्या सेवी,अभियानातंर्गत आमदार अँड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे आयोजित तामसवाडी येथे दिनांक १३ जून रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिर मधे ज्या लाभार्थीना चष्मे लागले त्या करिता आज रविवार रोजी ग्राम पंचायत कार्यालयच्या सभागृहात तामसवाडी येथे १९१ गरजू लाभार्थीना चष्मे वाटप करण्यात आले.

           या कार्यक्रम प्रसंगी,श्री. राजेशजी गोमकाळे-युवासेना तालुका प्रमुख,सौ.उषा शिवारऊके सरपंच तामसवाडी,आशिषजी काकड़े-उपसरपंच,पूजा उइके, रंजना चव्हाण,कुणाल पैठेऊके,संदीप केवट,ऐश्वर्या बांगरे,राजकन्या परतेकी,विलास गुजरमाळे,गजाननजी गोमकाळे,भाऊरावजी पैठेऊके,नंदूजी लकड़कर,गंगाधरजी काकड़े,तन्मय काकड़े,अरुण गोमकाळे,शिवसेना वैद्यकीय नागपूर ग्रामिण जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर,सुमित कामड़े उपस्थित होते.

          आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.

          याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे. अशी माहीती शिवसेना वैद्यकीय नागपूर ग्रामिण जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर यानी दिली.