छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे वृक्षारोपण.‌.

 

रत्नदिप तंतरपाळे/ चांदूर बाजार तालुका प्रतिनिधी

             छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दिनांक ५ जुलै २०२३ रोजी आमदार बच्चुभाऊ कडू (अचलपूर चांदूरबाजार मतदार संघ ) यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये त्याचप्रमाणे दत्तक ग्राम कृष्णापुर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

           रक्तदान शिबिरामध्ये रासोयेच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने जवळपास वीस ( २०) वृक्ष लावण्यात आले. 

             यामध्ये कडूनिंब वळ,पिंपळ,बकुळी,साग, पळस,इत्यादी प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षाचा संवर्धन, जोपासना करण्याची संकल्पना करण्यात आली.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे,प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे उपस्थित होते त्यांनी वृक्षाचे महत्त्व आणि संवर्धन कशा प्रकारे करायचे यांचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दत्तग्राम कृष्णापूर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सौ रूपालीताई नि. रेखे ( सरपंच कृष्णापुर ) उपसरपंच तथा समस्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्री गजाननराव रेखे,श्री राजाभाऊ गावंडे, श्री निलेशराव रेखे, योगेश रोशन श्याम अथर्व संतोष विवेक रत्नदीप विराज व समस्त गावकरी मंडळीनी वृक्षारोपणा करता ऊसपुर्त सहभाग घेतला.

        या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले, या कार्यक्रमाला डॉ.कल्याणकर डॉ.हरीश काळे, श्री.आशिष ढोके(मुख्याध्यापक )डॉ.सदार प्रा.लिल्हारे, निबोरकर मॅडम, वाटाणे घोम,सोळके, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रोशन प्रज्वल रोहित विवेक अक्षय शाहरुख पूजा अश्विनी उपस्थित होते.