कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- पारशिवनी तालुकात सर्वांसाठी घरकुल योजना राबविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार असून वेळ पडल्यास गोरगरिबांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेण्यास मी तयार आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी केले.
पारशिवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत आमगाव (बाबरवाडा) येथे आयोजित पट्टा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषद नागपूर अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे,उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी मंत्री तथा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपालजी चौकसे पर्यटन मित्र व रामधाम संस्थापक,माजी जिप अध्यक्षा रश्मी बर्वे,जिप शिक्षण सभापती राजू कुसुंबे,महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा.अवंतिका लेकुरवडे,जि.प.सदस्या अर्चना दिपक भोयर,दुधाराम सव्वालाखे,प.स.सभापती मंगलाताई उमराव निंबोने,माजी सभापती चेतन देशमुख,सरपंच सौ.मायाताई गोरले,महेंद्र शिक्षण संस्था सचिव पंकज बावनकुळे,प्राचार्या सौ.राजश्री ऊखरे,दयारामजी भोयर अध्यक्ष पारशिवनी तालुका,अशोकराव चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,कस्तुरचंद पालीवाल अध्यक्ष नरेंद्र जिनिंग,डुमनजी चकोले,सिध्दार्थ खोब्रागडे,दिपक भोयर,सितारामजी भारद्वाज प.स. सदस्य,सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
गट ग्रामपंचायत आमगाव (बाबरवाडा) च्या कार्यक्रम लालबहादुर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात केदार यांच्या हस्ते ८४ नागरिकांना पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
आपल्या पुढील भाषणात केदार म्हणाले की,स्वतःचे घर ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे.मात्र आजही प्रशासकीय अनागोंदीमुळे घरे उपलब्ध करून देण्यात येत नाही.त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित आहे.
मंत्रीपद भूषविताना त्यांनी पारशिवनी तालुक्यातील पट्टे वाटपाबाबत बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली असती तर आज ८४ कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असती.
जिल्ह्यातील इतर गावांसाठीही असेच प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार सुनिल बाबु केदार यांनी उपस्थितांना दिले.या कामासाठी पारशिवनी पं स चे सभापती सौ. मंगलाताई निम्बोने यांनी व जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई भोयर व माजी उपसभापती चेतन देशमुख यांनी अथक परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
लालबहादूर शास्त्री विघालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडा तर्फे भव्य सत्कार.
शासकीय पट्टे वाटप सोहळा लालबहादूर शास्त्री विघालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडा येथील सांस्कृतिक सभागृहात पार पडला.
माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ मुक्ताताई कोकोड्डे यांचा विद्यालय व महेंद्र शिक्षण संस्था नागपूर च्या वतीने संस्था सचिव पंकज बावनकुळे व प्राचार्या सौ राजश्री ऊखरे यांनी भव्य दिव्य सत्कार करुन उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले.
पाहुण्यांचे शालेय विद्यार्थीनीनी स्वागत गीतानी स्वागत केले.
माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे व जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकोड्डे यांनी लालबहादूर शास्त्री विघालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडा येथील प्राचार्या सौ राजश्री ऊखरे व संस्था सचिव पंकज बावनकुळे यांना प्रोत्साहित केले.