श्री संत दानाप्पा महाराज यांचा भंडारा भारुडाच्या जुगलबंदी सामन्याने उत्साहात साजरी…

 

बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर  प्रतिनिधी 

   पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे श्री संत दानापा महाराज यांचा भंडारा भागातील आनेक वारकरी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भारुडाच्या जुगलबंदी सामन्याने उत्साहात साजरा करण्यात आला.

       या निमित्त ह भ प श्रीराम महाराज शेळके सह पिंपरी गावातील भजनी मंडळ व वारकरी आणि ग्रामस्थ पालखी घेऊन गाव प्रदक्षिणा घेण्यात आली. प्रत्येक घरोघरी पालखीची महापूजा चहा नाष्टा करण्यात आला. सर्वच ग्रामस्थांच्या वतीने या निमित्त भाविकांना महाप्रसाद व नाष्टा देण्यात आला.

         दिंडी सोहळ्या प्रसंगी आई तुळजाभवानी मंदिराच्या समोर पालखीचा विसावा झाला या ठिकानी भारुड सम्राट दिनकर आवताडे महाराज सह मदने महाराज पुळुज, गवळी महाराज मंगळवेढा या तीन भारुड सम्राटांचा जुगलबंदी सामना रंगल्याने सर्व वारकरी व भाविक भक्तामध्ये सुंदर प्रकारे आनंद व्यक्त झाला पालखीची दिंडी प्रदक्षिणा गावामध्ये घेऊन समस्त ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांच्या उपस्थितीत पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल मंदिरामध्ये पालखी घेऊन आल्यानंतर सर्व वारकऱ्यांसमवेत ह भ प राम महाराज शेळके यांची काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली.व शेवटी महाप्रसाद घेऊन दानापा महाराज भंडाऱ्याची सांगता झाली.