भारतीय बौद्ध तालूका शाखा अमरावती ( पश्चिम) ९ जुलैला चिंतन शिबिर…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

            महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे आदेशाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा अमरावती ( पश्चिम ) च्या वतीने रविवार दि. ९ जुलै २०२३ ला सकाळी ११:३० ते ०४:०० मेत्रेय बुद्ध विहार, आठवडी बाजार परिसर, परतवाडा येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. मुकेश सरदार सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या चिंतन शिबिराला राज्य कार्यकारणीचे विभागीय सचिव आयु. विजयकुमार चौरपागर साहेब मार्गदर्शन करणार आहेत.

        महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने आखून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या शिबिराच्या आयोजन करण्यात आले. सकाळी ११:०० वाजता कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यात येऊन, शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभा कारभार कशा पद्धतीने करावा, वर्षवासात प्रत्येक विहारांमध्ये दिलेल्या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करणे, भारतीय बौद्ध महासभेचे सभासद नोंदणी अभियान, धम्मयान या मासिकाकरिता (भारतीय बौद्ध महासभेच्या मुखपत्राचे) सभासदांची नोंदणी करणे, संस्थेच्या हिशोबाचे लेखे कशाप्रकारे ठेवणे, सक्रिय सभासदांची तसेच आजिव सभासदांची नोंदणी मोहीम राबविणे तसेच संस्कारक्षम नागरिक घडविणे या संदर्भात या चिंतन शिबिरामध्ये चर्चा करण्यात येईल.

          प्रा. डॉ. मुकेश सरदार सर (जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिरामध्ये आयु. सतीश दादा इंगोले, आयु. मंगल निताळे सर. प्रमोद खाडे (समता सैनिक दल, विभाग) उमाताई वानखडे ( माजी,जिल्हा सचिव) संगीताताई सरदार (केंद्रीय शिक्षिका), पुनम वानखडे ( केंद्रीय शिक्षिका )प्रमिलाताई डांगे (केंद्रीय शिक्षिका) पूनमताई देवळेकर ( केंद्रीय शिक्षिका),आशाताई इंगळे (केंद्रीय शिक्षिका), निर्मलाताई नागले तालुका उपाध्यक्ष (महिला), जे.बी. गायकवाड तालुका उपाध्यक्ष या चिंतन शिबिराला जिल्हातील जिल्हा, तालुका, शहर, ग्राम शाखा व सर्व पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक, शिक्षिका बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सैनिक या सर्वांनी उपस्थित राहण्याचे भारतीय बौद्ध महासभा अमरावती ( पश्चिम )आव्हान करत आहे.