खेडी येथे शिवसेना(उ.बा.ठा.) महिला सेनेच्या संगठनात्मक आढावा बैठकीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

पारशिवनी:- शनिवार  दि.०९.०६.२०२४ रोजी रात्री ८ वाजता च्या दरम्यान शिवसेना  रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे याचे मार्गदर्शनात  तालुका  पारशिवनी मधिल महिलाची सगठनात्मक चर्चा मनिमखेडा ,गांगणेर, गाव खेडी (खोपडी) येथे आगामी विधानसभा च्या वतीने महिला सशक्तीकरण आढावा बैठक सौ.दुर्गाताई कोचे(जिल्हाप्रमुख, महिला सेना,शिवसेना उ.बा.ठा.)यांच्या प्रमुख उपस्थितीत व सौ.वैशालीताई सतिश बरबटे(समाजसेविका) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या वेळी महिलांना येणाऱ्या समस्या, महिलांसाठी असलेल्या विविध योजना ह्या सामान्य पर्यंत पोहचाव्या तसेच महिलांनी रोजगार स्वयंरोजगार यावर भर देऊन स्वतःच्या पायावर उभे होऊन सक्षम व्हावे यासाठी सौ.वैशालीताई सतिश बरबटे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.

         या प्रसंगी  सौ.मंगला महादुले,सौ.कांता महादुले,श्री.प्रविण राऊत,श्री.रामेश्वर वराडे, सौ.शशिकला नागपूरे,सौ.मायाबाई नागपूरे,सौ.नंदाबाई चौधरी, सौ.लक्ष्मीबाई चौधरी,सौ.पुष्पबाई वानखेडे,सौ.प्रमिला काळे,सौ.प्रतिभा इंगळे,सौ.माधुरी इंगळे,श्री.प्रकाश इंगळे,श्री.दिलीप घरजाळे, श्री.नंदू कोचे,श्री.श्यामराव इंगळे व मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.