महाराष्ट्र दर्शन पडले महागात… — दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे घर फोडले… — संशयित युवकाविरुध्द गुन्हा दाखल…

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

       खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील हयापुर येथील महाराष्ट्र दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे घर फोडून 24,550 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून महिलेच्या तक्रारीवरुन गावातील 23 वर्षीय युवकाविरुध्द खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      हयापुर येथील चंद्रकला रामकृष्ण सोळंके(46) या महराष्ट्र दर्शनासाठी गेल्या होत्या हिच संधी साधून त्यांच्या घरातील शौचालयाच्या भिंतीच्या विटा काढून घराच्या आत प्रवेश करीत घरातील 14 हजार रुपये किंमतीचे दोन तुरीचे कट्टे,7500 रुपयांच्या चांदीच्या तोरड्या,50 रुपये किंमतीचा चांदीचा शिक्का,1500 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने,1500 रुपये रोख असा एकुण 24,550 रुपयांचा ऐवज गावतीलच संशयित युवकाने लंपास केला.

       याप्रकरणी फिर्यादी चंद्रकला रामकृष्ण सोळंके यांच्या यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये संशयित युवक प्रेमदास रामदास कवाडे(23) यानेच घरात चोरी केल्याचा संशय व्यक्त केला त्याआधारे खल्लार पोलिसांनी प्रेमदास रामदास कवाडे याच्या विरुध्द कलम 457,454,380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.