डुमरीकला शेताशिवारातून समरसिबल पंप व साहित्य गेले चोरीला.. — अंदाजे २० हजार रुपयांचा माल चोरीला.

कमलसिंह यादव 

    प्रतिनिधी

पारशिवनी:- पो.स्टे.अर्तगत पूर्वेस १५ कि.मी. अंतरावर असलेला डुमरीकला गाव शेतशिवार येथून रविवार दिनाक ७ मे चे रात्रो ७ वाजताच्या नतर आणी दिनाक ८ मे च्या सकाळी ६.०० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी समरसिबल पंप व साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

       तक्रारदार लक्ष्मीकांत मधुकर डेगें वय २५ वर्ष राहणार डुमरीकला,पारशिवनी यांनी पो. स्टे.येथे चोरी संबधाने तक्रार दिली.

         शेतातील बोरवेल मधून आशिर्वाद कंपनीची समर सिबल मोटार किमत 10 हजार रुपये, 

2) LT – कंपनीचा स्टार्टर किमती 6,000 रु.

3) 4MM केबल वायर किमती 3,000 रु. 

4) 250 फुट रस्सी (दोर) व बोअरवेल वर ठेवलेले लोखंडी कॅप (झाकन) किमती 1,000 रु. असा एकूण 20,000 रु.चा माल. अज्ञात चोराने चेरून नेल्याची तोंडी द्वारे तक्रार नोंद केली.

         पारशिवनी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गंगाप्रसाद वरकडे पुढील तपास करीत आहेत व आरोपीचा शोध घेत आहेत.