अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी… — शासकिय आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे… — तालुका काँग्रेस युवक काँग्रेस ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी….

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

देसाईगंज :-  तालुक्यात या चालू वर्षात एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी धान पीक, मका, आदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शासकिय स्तरावरून पंचनामे करण्यात आलेले नाहीत त्यामुळे शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना वेळीच शासनाकडून आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. 

     देसाईगंज तालुक्यात रब्बी पिकांची खरेदी ही खाजगी व्यापारी अत्यंत कमी किमतीत खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यांची फसवणूक थाबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी ही शासकिय आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासकिय आधारभूत खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेली नुकसानीची तात्काळ पंचनामा करून मोबदला देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी तर्फे देसाईगंज चे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

       यावेळी निवेदन देताना, यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपाध्यक्ष संजय करंकर, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे, महासचिव मनोहर निमजे, दुर्वास नाईक, सचिव सर्वेश्वर मेश्राम, कुरुड- कोकडी निरक्षक सुरेश मेश्राम, आमगाव – विसोरा निरीक्षक टिकाराम साहारे, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, शहराध्यक्ष विक्की डांगे, युकाँ. उपाध्यक्ष देवणाथ सयाम, महासचिव अमर बगमारे, महेश चंडीकार, सेवादल शहराध्यक्ष भिमराव नगराळे, बंडू मयस्कर उपाध्यक्ष सेवादल, गिरिधर कामटे सचिव, विलास लोखंडे सहसचिव सेवादल, बेबी शंभरकर सेवादल उपाध्यक्ष, विमल मेश्राम कोषाध्यक्ष सेवादल, अल्का पिल्लेवान कार्याध्यक्ष सेवादल, पुष्पा कोहपरे, कुंदा लिंगायत, मिना मंडपे, पदमा कोडापे, पिंकू बावणे, नरेश लिंगायत, रामजी मानकर, आदी काँग्रेस युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.