पारशिवनी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिदें व भाजपा राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांची विजय संकल्प सभा संपन्न.

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि प्रतिनिधी

        पारशिवनी :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज पारशिवनी येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

          यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधून राजू पारवे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.

         रामटेक लोकसभा मतदारसंघ हा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे आपण सर्वजण या मतदार संघातून प्रभू श्रीरामांना मंदिरात नेऊन विराजमान करणारा उमेदवार विजयी कराल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. 

          देशात गेल्या १० वर्षात मोदीजींनी अनेक विकासकामे केली असून देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे, त्यामुळेच या देशात मोदीजीं चीच गॅरेंटी चालत असून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवून त्यांची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी राजू पारवे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.  

          यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार आशिष जैस्वाल , खासदार श्री.कृपाल तुमाने, महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, रासप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.