कैंलासवासी झुंजार वस्ताद यांचे विचार व शिकवन ही परंपरा कुस्ती आखाड्याच्या माध्यमातून आमच्या सोलनकर परिवारामध्ये यांचा कधीच विसर पडणार नाही :-पैलवान हिम्मतभाऊ सोलनकर यांचे उद्गार –मल्ल सम्राट कैलासवासी झुंजार सोलनकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त निकाली कुस्त्याचे मैदान उत्साहात पार पाडले… — 1400 हुन अधिक पैलवानांची उपस्थिती…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधि

         टाकळी तालुका माढा येथे सालाबाद प्रमाणे कैलासवासी झुंजार वस्ताद यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.

       100 रुपये पासून ते 2 लाख रुपये इनाम पर्यंतच्या निकाली कुस्त्या या मैदानामध्ये लावण्यात आल्या.

        1400 हुन अधिक मल्ल सम्राट पैलवान यांची या नामवंत आखाड्यामध्ये उपस्थिती होती.

        दुपारी 3 वाजता कुस्ती आखाडा पुजन प्रसंगी पैलवान हिम्मतभाऊ सोलनकर पुढे म्हणाले की?

         कैलासवासी झुंजार वस्ताद यांची आठवण म्हणून आम्ही सालाबाद प्रमाणे कुस्ती आखाड्याची परंपरा ही टिकवून ठेवलेली आहे. आजही या कुस्ती मैदानाची ओळख ही महाराष्ट्रासह आनेक राज्यांमध्येही आहे. म्हणूनच इथून पुढेही आमचा सोलनकर परिवार कुस्ती आखाडा भरवण्यातसाठ कमी पडणार नाही तसेच कुस्ती आखाड्यामध्ये कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात येणारच,, पैलवान व माढा कारखान्याचे माजी संचालक हिम्मत भाऊ सोलंकर यांनी मीडियाशी बोलताना सांगीत होते.

             रविवार दि. 7 एप्रिल 2024 रोजी कैलासवासी वस्ताद झुंजार देवराव सोलनकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त टाकळी ता.माढा जि. सोलापूर येथील महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान हजारो कुस्ती शोकिनांच्या साक्षीने संपन्न झाला.

          या कुस्ती मैदानचा खास आकर्षण आसणारी मानाची 1 नंबर ची कुस्ती पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर 10 मिनिटानंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली,, नंबर 2 ची कुस्ती पैलवान कालीचरण झुंजार सोलनकर व सेनादलाचा पैलवान ओंकार चौगुले याला 23 मिनिटांनी दुहेरी पट काढून एकलांग चढवून चीतपट मारले व हजारो मने कुस्ती शौकिनांची मने जिंकली. हजारो रुपयांचे बक्षीसही मिळाली.

            नंबर 3 ची कुस्ती पैलवान आप्पा ओळखूडे आणि पैलवान विश्वचरण झुंजार सोलंकर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.

         नंबर 4 ची कुस्ती पैलवान अविनाश गावडे व पैलवान अजय राजमाने कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

          या कुस्ती मैदानची प्रसिद्धीचे नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातून वस्ताद व पैलवान यांची उपस्थिती झाली.झुंजार सोलनकर वस्ताद यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे जिवाभावाचे सहकारी उपस्थित होते.

           या मैदानाचे आयोजक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा यांचे संचालक पैलवान हिम्मतभाऊ सोलनकर झुंजार सोलनकर कुस्ती नियोजन कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदान पार पडले.

        आखाड्यामध्ये आलेल्या मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. मैदान पार पाडण्यामध्ये मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब आप्पा मगर यांचं बहुमोलाचे योगदान मिळाले या कुस्ती मैदान साठी राजकीय क्षेत्रातील माढा तालुक्यातील व इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय मान्यवरांची उपस्थित होते.

             माढा तालुक्याचे भावी आमदार रणजीत भैया शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, इंदापूर तालुका पंचायत समिती संचालक प्रदीपमामा जगदाळे, सोलापूर जिल्हा शिवसेना नेते नामदेव वाघमारे, बंडु नाना ढवळे, प्रकाश आण्णा शिंदे, रणजीत वाघमोडे ,आशोक भाऊ चोरमले ,माजी जिल्हा परिषद सदस्य चित्राताई वाघ, अनेक राजकीय नेत्यांची उपस्थित होते त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातील मान्यवर महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, विश्वास दादा हरगुले , आण्णा गायकवाड, बापू कोकाटे ,आप्पासाहेब वाघमोडे ,गौतम माने ,संभाजी जाधव, उमेश इंगळे ,मारुती माळी, सर्जेराव चौरे, लक्ष्मण गावडे, सुनील बोडके, रंजीत वाघमोडे , कमाल जमादार , नरसिंहपूरचे वस्ताद, शिवाजी पाटील जि.प. सदस्य सोलापूर, किसन बापू पाटील कृ.उ.बा.स. संचालक, कैलास प्रकाश पिसाळ उद्योजक हे सर्व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            कुस्ती मैदान हे जगभरात थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. महिला कुस्ती शौकीन या कुस्ती मैदान साठी उपस्थित होत्या कुस्ती मैदानचा खास आकर्षणाचा विषय सूत्रसंचालन हे पैलवान युवराज तात्या केचे गारअकोले यांनी केले.अनेकांची मने जिंकली तसेच कुस्ती मैदानमध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य बाळासाहेब भाऊ देहुकर यांना झुंजार सोलंकर यांच्या स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

           वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर कुस्ती मैदान साठी उपस्थित होते. वस्ताद महादेव ठवरे यांची कन्या राजेश्वरी ठवरे या महिला कुस्तीपटूंनी अतिशय चांगली कुस्ती केली सलोनी बैरागी या महिला कुस्तीपटूंनी अतिशय चांगली कुस्ती केली उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार कैलासवासी वस्ताद झुंजार देवराव सोलंकर कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने युवा नेते पैलवान काकासाहेब पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.

चौकट 

बाळूताई झुंजार सोलनकर यांनी आपले पती गेल्याचे दुःख डोळ्यासमोर ठेवून,माझे पतीही पैलवान होते यांची आठवण राहण्यासाठी,त्यांचीच दोन मुले पैलवान कालीचरण सोलनकर व पैलवान विश्वचरण सोलनकर या दोघांना स्वतःच्या जिद्दीवर पैलवान केले.आणी सोलनकर या नावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावा रूपाला बाळूताई झुंजार सोलनकर यांनी आणली.