दुचाकी वर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांना केले जेरबंद

 

ऋषी सहारे

संपादक

 

देसाईगंज –

अर्जुनी वरून दिनांक 09.04.2023 रोजी सकाळी एका दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पो. अमलदार निकलेश सोनवणे यांनी सैनिक ढाबा जवळ पंच व पोलीस स्टाफ मिळून नमूद आरोपीची प्रोव्ही रेड बाबत पाहणी केली असता त्यांच्या ताब्यात खालील वर्णनाच्या व किमतीच्या माल मिळून आल्याने पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अपराध क्रमांक 0091/2023 दिनांक 09.04.2023 कलम 65 (अ),83,98 (2) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले.

आरोपीकडून मिळालेला माल

1) 07 खर्ड्याच्या बॉक्समध्ये देशी दारू संत्री कंपनीच्या 90 मिली मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी 100 निपा असा एकूण 700 निपा अवैध विक्री किंमत 100 रुपये प्रमाणे 70,000/- रुपयाचा माल.

2) एक जुनी वापरती काळ्या रंगाची होंडा एक्टिवा दुचाकी वाहन क्रमांक 33 वाय 2067 किंमत अंदाजे 60,000/- रुपये असा एकूण 1,30,000/- रुपयाच्या माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.

यातील आरोपी:- 1) यश सुनिल गेडाम, वय 24 वर्ष तुकुम वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली.

2) शैलेश विनोद बोरकर , वय 28 गोकुलनगर, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली.

यातील तपासी अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार पोलीस स्टेशन देसाईगंज. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.