साकोलीत भीमपर्व ग्रुप तर्फे 11 एप्रिलला प्रबोधन व कव्वाली कार्यक्रम.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली- महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त प्रबोधन व कव्वाली चा कार्यक्रम विदर्भाची प्रसिद्ध गायक तनुजा नागदेवे यांचा होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे 11 एप्रिल 2023 ला सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहेे. कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले करतील तर अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते राहतील प्रमुख अतिथी म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, बी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे समाजकल्याण सभापती मदन रामटेके, दादासाहेब कोचे , साहित्यिक डॉक्टर प्रा सुरेश खोब्रागडे ,डॉ प्रा शंकर बागडे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे ,वनिता डोये, शितल राऊत, कविता रंगारी व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत . जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, शिलवान रंगारी, आश्विन रंगारी, शुभम खांडेकर, अमित नागदेवे ,जगदीश रगारी, श्रावण नंदेश्वर ,यशवंत उप्रिकार, सुवर्णमाला गजभिये ,शितल नागदेवे, ज्योती घरडे,प्रशिक मोटघरे ,नितीन रामटेके व इतर सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे.