विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या उत्तर गडचिरोली युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सरोज सहारे यांची नियुक्ती….

सुरज मेश्राम

तालुका प्रतिनिधी

ता.कुरखेडा

पुराडा:-गडचिरोली जिल्हा उत्तर गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांनी नियुक्त पत्र देऊन त्यांची नियुक्ती केली आहे. सरोज सहारे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मा.ऍड.वामनराव चटप (माजी आमदार) विराआस,मुकेश मासुरकर, अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेश,अरुणभाऊ केदार, अध्यक्ष पूर्व विदर्भ, राजेंद्रसिंह ठाकूर उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष, यांना दिले.

     तर त्यांच्या नियुक्ती बद्दल विदर्भ राज्य आंदोलन समिती चे रामचंद्र रोकडे तालुका अध्यक्ष ता. कुरखेडा, चूनेश्वर मानकर तालुका संघटक, नेपाल मारगाये तालुका युवा आघाडी प्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.