2022 च्या अतिवृष्टीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना आठ दिवसात देण्यात यावी… — युवासेनेचे तहसिलदार यांना निवेदन…

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

         सन 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अन्यथा दर्यापूर तालुक्यातील सर्व तलाठ्यांना कोंडून आंदोलन केल्या जाईल अश्या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने दर्यापूरच्या तहसिलदारांना आज(८)सप्टेंबरला देण्यात आले.

        2022च्या अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतकरी हे तलाठी कार्यालयात चकरा मारीत असून तलाठी हे कृषी सहाय्यक यांच्याकडे पाठवितात कृषी सहाय्यक हे ग्रामसेवक यांच्याकडे पाठवितात अश्या प्रकारे अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शासनाचे कर्मचारी अवहेलना करुन थट्टा करीत आहेत. संबंधित कर्मचारी यांच्यावर कुणाचाच अंकुश नाही त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने आर्थिक मदतीसाठी कुणाकडे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

          येत्या आठ दिवसात 2022च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करण्यात यावी अन्यथा दर्यापूर तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयात जाऊन संबंधित तलाठी यांना त्यांच्या कार्यालयात कोंडल्या जाईल अश्या आशयाचे निवेदन व मागणी शिवसेना(उबाठा) प्रणित युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा चंडिकापूर ग्रा पं चे उपसरपंच प्रमोद धनोकार यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर तहसिलदार यांना देण्यात आले यावेळी अनिल गवई, रविंद्र कावरे, सुनिल धुरंधर, निलेश इंगोले, ए राजा, शेखर पाटील टाले, विनोद धुरंधर, प्रशांत भडांगे, गजानन इंगोले, समाधान गायकवाड, अशोक गणोरकर, रणजित टोळे व इतर शेतकरी उपस्थित होते.