मौजा हेटी जिल्हा परिषद शाळेतील अज्ञात इसमांने केली तोडफोड… — छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती चोरी…

 

जिल्हा प्रतिनिधी :-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

    चंद्रपूर

सिंदेवाही:-

शहरातील हेटी वार्ड परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन या शाळेमधे अज्ञात इसमाने तोडफोड करून शिवाजी महाराजाची मूर्ती चोरी गेल्याची ही घटना गुरुवार च्या सकाळी उघडकीस आली.

           शहरातील हेटी वार्ड परिसरातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेली जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन ची ही शाळा आहे. शाळेच्या सहायक शिक्षिका वर्षा कश्यप नेहमी प्रमाणे गुरुवार (दि. ७) च्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास शाळेत आले असता त्यांना शाळेचे दार सुरू अवस्थेत प्रवेश करुन बघितले असता, लोखंडी कपाटाचे दार खुले होते.

           सोबतच संगणक यंत्र सुद्धा व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. दरम्यान पुन्हा सहायक शिक्षिका वर्षा कश्यप यांनी खोलीच्या आतील साहित्यांची पडताळणी केली असता त्यांना त्याच खोलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती चोरी झाल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकारी याना दिली. त्यामुळे सबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्याची माहिती पोलिसांना कळविले.

सदर घटनेच्या अगोदर सुद्धा ह्या शाळेच्या मुख्याध्यापक संबधात चर्चेत होती हे विशेष.

        तालुक्यातील शिक्षण विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन चे मुख्याध्यापक निलंबन केल्याची चर्चा होती. त्यामुळे या शाळेत सध्या एकच शिक्षिका कार्यरत आहे. ही घटना ताजी असतानाच हेटी शाळेत चोरीचा प्रकार आढळून आला आहे. त्यातच शाळेतील शिवाजी महाराजांची मूर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनात आले.

        सदर या घटने नंतर फक्त शिवाजी महाराजांची मूर्तीच चोरीला गेली की, शाळेतील कपाटातील महत्त्वाची कागदपत्र सुद्धा गहाळ झाले याची चर्चा शिक्षण विभाग व शहरात रंगत चाललेली आहे.

         शाळेत साहित्यांची तोडफोड केल्याची माहीती शिक्षिका वर्षा कश्यप यांनी गटशिक्षणाधिकारी सिंदेवाही व पोलीस विभाग सिंदेवाही यांना दिली. बिडिओ अक्षय सुकरे व गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी शाळेला भेट दिली सोबतच पोलीस निरीक्षक तुषार चव्हान, पोलीस उपनिरीक्षक सागर महले यांनी सुद्धा शाळेला भेट देऊन पाहणी केली असता कोणतेही निष्कर्षावर पोहचू शकले नाही . ही घटना पूर्व नियोजित आहे की काय अशी पालकवर्गात चर्चा आहे.