मौजा चारगाव सुवरधरा रोड शिवार येथुन बकरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी::-पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत मौजा चारगाव सुवरधरा रोड शिवार येथून बकऱ्या चोरणाऱ्या आरोपींवर पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      फिर्यादी नामे सौ.किरण प्रकाश बगमारे वय ३४ वर्ष रा. चारगाव,ता.पारशिवनी येथे दिनांक ६/७/२४ रोजी ४/०० वा दरम्यान,यातील आरोपी हे संगनमत करून आपले ताब्यातील मोटर सायकल क्रमांक एम.एच.३१,एटी ०५८५ वर फिर्यादी यांची रोडच्या बाजुला चरत असलेली बकरी एक लाल तपकीरी रंगाची किंमत ६०००/- रू ची चोरून नेत असल्याचा संशय आल्याने गावातील लोकांनी पोलीसांना सांगितले.

      सदर आरोपींना पकडुन त्यांना सखोल विचारपुस केली असता बकरी चोरी करून नेत असल्याची कबुली दिल्याने सदर नमुद दोन्ही आरोपी नामे अजित पुरूषोत्तम नेवारे वय १९ वर्ष,२. विलास मधुकर ईनवाते वय २२ वर्ष दोन्ही रा कोथुरर्णा,ता.सावनेर यांचे विरूध्द फिर्यादी सौ.किरण प्रकाश बगमारे यानी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे गुन्हा दाखल केला.

        कलम ३०३ (२), ३, (५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कडुन संपुर्ण माल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीतांवर नमुद कलमान्वयें कारवाई करण्यात आली आहे.पुढील तपास सफौ देवानंद उकेबोंद्रे करीत आहे.

     सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ,यांचे मार्गदर्शनाखाली पारशिवनी येथील ठाणेदार श्री.राजेशकुमार थोरात,सफौ देवानंद उकेबोंद्रे, पोहवा उमेश इंगळे यांचे पथकाने पार पाडली.