जीवनदान:पातागुडम पोमके येथील सर्प मित्र पोलीस शिपाई गौतम गावाई यांनी तीन हजार चारशे साठ सापांना दिले जीवनदान… — आठ फुटाचा अजगर कोंबड्याची शिकार करून थेट पोलीस ठाण्यात “जणू त्याने गुन्हाची कबुली दिली”…

डॉ. जगदीश वेन्नम/संपादक

सिरोंचा:-आठ फुटाचा लांबी अजगर कोंबडीयची शिकार करून पोलीस स्टेशनं ला पोहचला जणू त्याने गुन्हाची कबुली दिली या अजगराने पोटातील कोंबडा बाहेर काढला.

         सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागातील पातागुडम पोलीस ठाण्यात काल दिनांक :-07/07/23 शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडाला.

      गडचिरोली जिल्हातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील उप पो देचीलिपेठा, रेगुंठा येथेही कर्तव्य बाजावीत असताना विषारी-बिनविषारी सापाना पकडून निसर्गाचा सानिध्यात सोडून त्या सापाना जीवदान दिले. जनतेची सुरक्षा व निसर्ग संवर्धनाचे अनमोल कार्य केल्याबद्दल गडचिरोली परिक्षेत्रचे पोलीस उप महानिरीक्षक मा. संदीप पाटील दिनांक :-25/11/20 रोजी पोलीस शिपाई गौतम गावाई यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं होतं.

      सर्वच साप विषारी असतात असे नसून काही सापच विषारी असतात परंतु दिसला की त्याला मारण्याचा विचार पटकन डोक्यात येतो. सापाला न मारता एक फोन केला तर सर्प मित्र गौतम गावाई काही वेळात पोहचून. सापाला सुरक्षित पकडून त्याला कोणतीही इजा न करता जीवनदान देतात.तीन हजार चारशे साठ सापांसह इतर वन्य प्राण्यांना पकडून जंगलातील सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे. पण पावसाळ्याच्या दिवसात सर्प मित्रांना जास्त धावपळ करावी लागते.

       पत्तागुडम पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सर्पमित्र पोलीस शिपाई गौतम गावाई हे अविरत सेवा करत आहे. एखाद्या घरात किंवा रस्त्यावर साप घुसला की लहान मुले व महिला यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. सर्प मित्र निसर्गाचे संतुलन राखत सापाला संपविण्यापेक्षा वाचवण्यात मोठा आनंद आहे. हे ध्येय मनाशी बाळगून सर्प मित्रानी शेतात असे किंवा जंगलातील त्या सापावर लक्ष ठेऊन फोन करण्याचे सांगीतले. अनेक साप हे विषारी असतात असे नसून काही सापच विषारी असतात.परंतु त्याला इजा केल्यास तो चावतो.

       त्यामुळे साप दिसला की घाबरून न जाता साप हा आपला खरा मित्र असून शत्रू नाही. अन्न धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरा वर साप हा पूर्ण नियंत्रण ठेवतो. धामण सापाची लांबी ६ फूट असतो. सापांची प्रजनन मार्च ते मे दरम्यान होते. मादी जातीचा साप ८ ते २० अंडी घालते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बिळा मध्ये पाणी जाऊन साप बाहेर पडत आहे. सापास जास्त अंडी सहन होत नाही. त्यामुळे सापाला न मारता सर्प मित्राला संपर्क केल्यास सापाचे जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. नाग हा साप ओळखायचा असेल तर रंग फिकट व पिवळा असतो त्याच्या नाकपुड्या डोके मान मोठे असते. नागाच्या फण्याच्या मागच्या बाजूला १० चा आकडा असतो. या नक्षीमध्ये ३० ते ३५ प्रकार आढळतात, मीडियाशी बोलताना सर्पमित्र पोलीस शिपाई गौतम गावाई यांनी सांगितले आहे.