समाज कोणत्या दिशेने चालला आहे याचे आत्मचिंतन करणं गरजेचे : खासदार सुप्रिया सुळे…. — आळंदीत किर्तन व प्रवचन प्रशिक्षण सांगता सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत काय वातावरण निर्माण झाले आहे हे आपण सर्व जण पाहत आहे, समाज कोणत्या दिशेने चालला आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, तसेच चांगल्या गोष्टींचा प्रचार व प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे, तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला पांडुरंग स्वतः भेटायला येईल असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आळंदी येथे बोलताना सांगितले.

         आळंदी येथील कारवा धर्मशाळेत गाथा परिवार आयोजित किर्तन व प्रवचन प्रशिक्षण सांगता समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, माजी आमदार जनार्दन कांडगे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले, अर्जुन कोकाटे, कैलास सांडभोर, सभापती कैलास लिंभोरे, चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे, मधुकर कंद, रुपाली पानसरे, पुष्पाताई कुऱ्हाडे, सतीष कुऱ्हाडे, निसार सय्यद, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

         यावेळी सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरातील प्रकरणाचा जाहीर निषेध केला, तसेच सरकार काय झोपले आहे का असा सवाल उपस्थित केला, इंद्रायणी नदीतील प्रदूषणाबाबत सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. आळंदीत गाथा परिवार आयोजित तिसरे कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण सांगता सोहळ्यात सामुहिक कीर्तन सुरू होताच खासदार सुप्रिया सुळे अखंड हरिनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

       आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले की सध्या किर्तनकार हे मुळ किर्तनापासून दुर जात आहे, कीर्तनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. किर्तनातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व इतर संत सांगणे आवश्यक आहे असे मोहिते पाटील यांनी सांगितले.