वंचितच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहदीप खोब्रागडे यांची नियुक्ती… — इतर १० पदाधिकाऱ्यांच्या नावाला मान्यता..

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

       वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहदीप खोब्रागडे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.ते कुशल संघटक असून वंचितचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.त्यांचे मुळ गाव चिमूर तालुक्यातील मौजा नेरी आहे.

       याचबरोबर चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जयदीप भानुदास खोब्रागडे (बाबू पेठ चंद्रपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे,तद्वतच उपाध्यक्षपदी सर्वश्री,रुपचंद निमगडे (चंद्रपूर),अश्विन मेश्राम (नागभिड),विनोद लक्ष्मण देठे(वाहानगाव,चिमूर),यांची वर्णी लागली आहे.

        तर जिल्हा सचिवपदी सर्वश्री,रविंद्र शेंडे सिंदेवाही,डॉ.सुरेश कुंभारे सावली,डॉ.राजू अलोणे साठगाव-चिमूर,भाऊराव चिवंडे वरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.