मौजा बांधगाव टोली येथील घरात घुसलेल्या वन्यप्राणी बिबट शावक (नर) यास जेरबंद करण्यात वनविभाग यशस्वी…

ऋषी सहारे

संपादक

 देलनवाडी वनपरिक्षेत्रातील मौजा बांधगाव टोली कोंबडी खाण्याच्या उद्देशाने अंदाजे सकाळी 6.00 वाजताचे सुमारास पाडुरंग आसाराम नैताम यांचे घरी बिबटयाचे शावक (नर) प्रवेश करुन 10 नग कोंबडया मारुन फस्त केले. त्यानंतर काजीराम तुळशिदास औरासे यांचे राहते घरी (गवताची झोपडी) मध्ये घरात घुसला व पलंगाच्या खाली बसून असल्याचे नामे काजीराम तुळशिदास औरासे यांनी गावात सांगितले. तेव्हा सदर घटनेची सपुर्ण माहिती तुकडोजी शिवराम लेढे राहणार बांधगाव यांनी भ्रमणध्वनीव्दारे वनकर्मचारी यांना दिली असता तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी देलनवाडी व वनकर्मचारी मौक्यावर पोहचुन पाहणी केली असता सदर बिबट शावक (नर) घरात असल्याचे आढळले असता वनकर्मचारी यांनी धर्मविर सालविठठल उपवनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांचे मार्गदर्शखाली अविनाश बी. मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) देलनवाडी (अति.) व वन्यजिव बचाव कार्य चमु वडसा वनविभाग वडसा तसेच फिरते पथक यांना तसेच गावातील किशोरजी राणे संरपच, ग्रामपंचायत बांधगाव, रुषी राणे पोलीस पाटील बांधगाव, जयवंत कापकर रा. बांधगाव व देलनवाडी वनपरिक्षेत्रातील एस. व्ही. नारनवरे क्षेत्र सहाय्यक देलनवाडी, ए.के.गांगरेडडीवार व.र.बांधगाव, के. टि. कुळमेथे उराडी, आर. पी. नन्नावरे व. र. देलनवाडी, एम.के.अलोने व.र.मांगदा व्हि.व्हि. राउत व. र. कोसरी व देलनवाडी वनपरिक्षेत्रातील सर्व वनमजुर तसेच मौजा बांधगाव गावातील नागरीक यांचे मदतीने काजीराम तुळशिदास औरासे यांचे राहते घरी असलेल्या दडुन बसलेल्या वन्यप्राणी बिबट शावक (नर) वय अंदाजे 24 ते 25 महिणे यास त्यांचे घरासभोवताल जाळी लावुन लोखंडी पिंज-यामध्ये सुरक्षीत इजा न पोहचवता जेरबंद करण्यात येवुन जेरबंद करण्यात आलेला बिबट शावक (नर) यास वनपरिक्षेत्र कार्यालय देलनवाडी येथे नेण्यात आले.

     त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी कुरखेडा यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन वैद्यकिय अधिकारी यांच्या परवानगी नंतर बांधगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 271 मध्ये सुरक्षित रित्या सोडण्यात आले.