ट्रॅक्टरने शेतीची मशागत करुन मुलगी लावतेय पित्यास हातभार….

 

युवराज डोंगरे/खल्लार

        मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी असे सर्वश्रृत आहे. हल्ली मुली प्रत्येक कार्यात अग्रेसर असताना त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत.

        परसापुर येथील प्रमोद नरवरे यांची मोठी मुलगी पलक नरवरे ही शेताची मशागत ट्रॅक्टरने करुन वडीलांना सहकार्य करीत आहे.

        प्रमोद नरवरे याना दोन्ही मुलीच असुन त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीचा आहे. मुलगा नसल्याची खंत न करता आपल्या मोठ्या पलक मुलीस ट्रॅक्टर चालवणे शिकवले त्यात तीने कसब मिळवले. शेती सांभाळावी अशी अपेक्षा केली असता दोन्ही मुली शिक्षण घेत शेतीची जबाबदारी सांभाळत आहे. पलक स्वतः ट्रॅक्टर चालवुन शेतीची कामे करीत आहे.. ती दहावी उत्तीर्ण असुन अचलपुर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत मुलांचीच मक्तेदारी असलेल्या ट्रक्टर चालक व्यवसायात आम्ही का मागे राहावे असा रोखठोक प्रश्न केला. आम्ही शेतीची पुर्ण मशागत करुन पाऊस येताच कापुस पेरणी करणार शिक्षणासह व वडीलाना शेतीस हातभार लावणार असे पलकने सांगीतले.