कुठलेही धागेदोरे नसतांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केला महिला अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यातील आरोपी.

 

ऋषी सहारे

संपादक

 

दिनांक – २७/०५/२०२३ रोजी पिडीत महिलेने पोलीस स्टेशन, चामोर्शी येथे येवुन तक्रार दिली की, सायंकाळी ५.०० वाजताचे सुमारांस ती तीचे काम संपवुन निर्जन रस्त्याने तीचे घराकडे जात असतांना अचानक एका अनोळखी इसमाने तीच्याशी जबरदस्ती करुन अत्याचार केला. तीने त्यांस प्रतिकार केला असता त्या अनोळखी इसमाने तीला जबर मारहाण केली. परिस्थितीचे गांभीर्य बघुन पोलीस स्टेशन चामोर्शी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी तीच्या तक्रारीची तात्काळ दखल घेवुन तीला उपचारार्थ महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे भरती करुन पिडीतेचे रिपोर्ट व वैद्यकिय अहवालावरुन पोस्टे चामोर्शी येथे अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक, कुमार चिंता यांनी प्रकरणाचे गांभीर्य बघुन तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, चामोर्शी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ४ पथके तयार करुन आरोपी निष्पन्न करुन अटक करण्याबाबत आदेशित केले. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील महिला अधिकारी सपोनि रुपाली पाटील यांनी पिडीतेची रुग्णालयात भेट घेवुन विचारपुस केली असता संबंधित पिडीतेवर झालेल्या अत्याचारामुळे तीच्यावर मानसिक आघात होवुन ती प्रकरणाची संपुर्ण माहिती देण्यास सक्षम नसल्याचे लक्षात येताच वन स्टॉप सेंटर गडचिरोली येथील समुपदेशक यांच्या मदतीने पिडीतेस विश्वासात घेवुन बोलते केले. पिडीतीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीचे रेखाचित्रकाराच्या मदतीने रेखाचित्र काढण्यात आले. त्याबाबत पोलीस स्टेशन,चामोर्शी यांनी त्यांचे परीसरातील संशयीत ईसमांकडे तसेच परीसरातील लोकांकडे सखोल विचारपुस केली असता सदर घटना तारीख वेळेपासुन त्या परीसरातील मिथुन मडावी हा ईसम फरार असुन त्याचे वर्णन रेखाचित्राशी मिळतेजुळते असल्याचे निष्पन्न होताच पोलीसाचा त्याचे विरुध्दचा संशय बळावला व त्याची शोध मोहिम सुरु करण्यात आली. संबंधित आरोपीचे नातेवाईक असणाऱ्या परीसरात गोपनिय बातमीदारांचे जाळे तयार करण्यात आले. संशयीत आरोपीचा भाऊ हा चंद्रपुर येथे राहत असल्याने चंद्रपुर येथील स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन त्यांना घटनेबाबत व संशयीत आरोपीबाबत माहिती देवुन आरोपीचा शोध घेण्याबाबत विनंती केल्यावरुन गोपनिय बातमीदारांकडुन आरोपी चंद्रपुर येथे असल्याची माहिती मिळताच दिनांक ०७/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मदतीने संशयीत आरोपीस ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे आणुन संशयीत आरोपीताकडे विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता गुन्ह्याच्या तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ पोस्टे चामोर्शी यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चामोर्शी येथील, पोनि उल्हास भुसारी व पोनि विजयानंद पाटील यांचे नेतृत्वात सपोनि रुपाली पाटील, पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, पोउपनि पल्लवी वाघ, पोउपनि सुधीर साठे, श्रेणी पोउपनि पुरुषोत्तम वाटगुरे, पोना / दिपक लेनगुरे, पोशि/ श्रीकांत बोईना, पोशि/सचिन घुबडे, पोना / अकबर पोयाम, पोशि/ प्रशांत गरफडे, पोशि/ श्रीकृष्ण परचाके, चापोना / शगीर शेख, चापोना / मनोहर टोगरवार, चापोना / माणिक निसार यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, चामोर्शी येथील सर्व पोलीस अंमलदार यांनी अहोरात्र परीश्रम घेतले.